पंकजा, धनंजयची लायकी नाही, नाव घेण्याची, गोपीनाथरावांच्या राजकारणासारखं राजकारण यांचं नाही; सार


पंकजा मुंडे धनंजय मुंडेंवर सारंगी महाजन : महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचे वारसदार कोण? असा प्रश्न विचारला जात आहे. हाच प्रश्न मुंडे यांचे कौटुंबिक नाते असलेल्या सारंगी महाजन (Sarangi Mahajan) यांना विचारला असता त्यांनी पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर प्रचंड टीका केली आहे. गोपीनाथ यांचे खरे वासरदार त्यांचे कार्यकर्ते आणि बीडमधील जनता असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हे बहीण भाऊ केवळ जमिनी लाटण्यासाठी एकत्र आले असून माझी जमीन देखील त्यांनी लाटली आहे. आज गोपीनाथ मुंडे असते तर बीड मधील कोणतेच प्रकरण झाले नसते. वाल्मिक कराडला वर येऊ दिले नसते तसेच या दोघांना देखील वर आणले नसते, असे सारंगी महाजन म्हणाल्या आहेत. या दोघांच्या राजकारणामुळे बीडमधील जनात प्रचंड नाराज असून यांना लोक शिव्या घालतात, असे देखील त्या म्हणाल्या.

सारंगी महाजन म्हणाल्या की, गोपीनाथ मुंडे हे मोठे नेते होते. त्यांचा वारसदार ही बीडची जनता आहे. बीडची जनता हे पहिले वारसदार आहेत. दुसरे वारसदार हे गोपीनाथ मुंडे यांचे कार्यकर्ते आहेत. पंकजा, धनंजयची त्यांचे नाव घेण्याची लायकी नाही.  गोपीनाथरावांच्या राजकारणासारखं राजकारण यांचं नाही. हे गोपीनाथ मुंडे यांच्या नावावर येऊन बसलेत. गोपीनाथ मुंडे यांनी मुलीला घडवलं. पण, ही घडली नाही तर बिघडली. ती जे दाखवते ते रिल्समध्ये दाखवते. ती  फक्त शोबाजी करते. खरं राजकारण नाही, असे म्हणत त्यांनी पंकजा मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला. तर धनंजय मुंडे यांनी आपल्या बायकोला सांभाळावं. हा नालायकासारखं वागतोय, असे म्हणत त्यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला.

Sarangi Mahajan on Pankaja Munde Dhananjay Munde: बहिण-भाऊ खंडणी उकळतात

गोपीनाथरावांनी कधीही कुणाची जमीन बळकावली नाही. हे बहिण भाऊ लोकांना लुटत असतात. खंडणी उकळत असतात. म्हणूनच हे बहिण भाऊ एकत्र आले आहेत. जिचा संसार नीट नाही ती काय लोकांचे संसार नीट लावेल? आम्हाला सुध्दा यांच्याच पक्षातील लोक सांगतात. देवेंद्रजींकडे मी गेले होते. ते बोलले मी काय यात करू शकतो. ते फक्त हसले, असे देखील सारंगी महाजन म्हणाल्या.

Sarangi Mahajan on Gopinath Munde: मला गोपीनाथरावांबद्दल अभिमान

सारंगी महाजन पुढे म्हणाल्या की, 2006 मध्ये गोपीनाथ मुंडे यांनी पडद्यामागून आम्हाला मदत केली. मला पोलिसांनी अटक केली नाही. गोपीनाथराव समोरून आले नाही. मात्र त्यांनी आम्हाला जी मदत केली, हे आम्हाला माहिती आहे. जावई म्हणून त्यांनी प्रवीणला प्रचंड मदत केली. त्यांनी आम्हाला ऑफ द रेकॉर्ड मदत केली. मला गोपीनाथरावांबद्दल अभिमान आहे, असे देखील त्यांनी म्हटले आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा Video

आणखी वाचा

Pankaja Munde on Manoj Jarange: समाजातील दरी मिटवूयात; पंकजा मुंडेंनी मनोज जरांगेंसमोर मैत्रीचा हात पुढे केला? नेमकं काय म्हणाल्या?

आणखी वाचा

Comments are closed.