सातारा ड्रग्ज प्रकरण! पोलिसांकडून तीन जणांना अटक, गुन्हे शाखेच्या विभागाकडून महत्वाचा खुलासा

सातारा क्राईम न्यूज सातारा जिल्ह्यातील सावरी गावातील असणाऱ्या शेडवर मुंबई पोलिसांनी टाकलेल्या धाडीत 45 किलो ड्रग्जचा साठा सापडला होता. या ड्रग्जची बाजारपेठेतील किंमत 145 कोटी रुपये इतकी आहे, त्या ठिकाणी काम करत असलेल्या तिघांना एकनाथ शिंदे यांचा भाऊ प्रकाश शिंदे याच्या जावळी तालुक्यातील हॉटेल तेज यश मधून जेवण जात असल्याचा असा खळबळजनक आरोप ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे बंधु प्रकाश शिदेंबाबत करण्यात आलेल्या आरोपानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून महत्वाचा खुलासा करण्यात आला आहेय.

या प्रकरणी पोलिसांकडून आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांकडून आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साताऱ्यातील जावळी बामनोली गावात सुरू असलेल्या ड्रग्ज कारखान्यावर कारवाई करण्यात आली होती. या कारवाईत ओंकार डिगे याचा सहभाग स्पष्ट झाल्यानंतर त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. ओंकारच्या चौकशीतून यातील इतर सहभागी आरोपींची नावे समोर आल्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नजर अब्बास सयद उर्फ सद्दाम 29, राजीकुल रहमान 30, हाजीबुल इस्लाम 25 या तिघांना अटक करण्यात आली आहे

तपासातील एक आरोपी पालघरमध्ये आहे. तर एक आरोपी हे आसामच्या मोरीगावचे असल्याचे निष्पन्न झाले आहेत. तसेच या कारवाईनंतर त्याचा संदर्भ देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे बंधु प्रकाश शिंदें यांच्या जमिनीवर असलेल्या हॉटेलशी जोडण्यात येत होता. त्याबाबत पोलिसांनी खुलासा करताना प्रकाश शिंदेंनी भाडेतत्वावर दिलेल्या जागेत सुरू असलेल्या हॉटेल तेजयश मधून आरोपींना कुठलेही जेवण दिले जात नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. तर दरेगावातील सरपंच रणजीत शिंदे  यांचा नमुद गुन्ह्याच्या तपासामध्ये अद्यापपर्यंत कोणताही संबध निर्दर्शनास आला नसल्याचे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

सुषमा अंधारे यांनी नेमके काय आरोप केले?

13 डिसेंबर रोजी सावरी गावात कारवाई झाली. सुरवातीला मुकंद गावात कारवाई झाली होती. त्याचे धागेदोरे पुण्यात आले. यात विशाल मोरे याला ताब्यात घेण्यात आले असून पोलिसांकडून त्याची चौकशी सुरू आहे. त्याच्या चौकशीतून सावरी गावाची माहिती मिळाली. या गावात पोलिसांचे पथक पोहोचले. मी स्वतः सावरी गावात जाऊन आले आणि मला काही धक्कादायक माहिती मिळाली. याठिकाणी कोयनेचे बॅकवॉटर आहे. इथे स्विमिंग टँक तयार होत आहेत. रिसॉर्ट होत आहे.. इथून जवळ असणाऱ्या पत्र्याच्या शेडमध्ये कारवाई करण्यात आली. इथे 75 लाख खर्च करून रस्ता तयार करण्यात आला आहे. इथे गाव नाही, माणूस नाही तरी येथे शेडला जोडणारा रस्ता का तयार करण्यात आला? येथील रिसॉर्टमध्ये सात ते आठ रूम बांधून तयार आहेत. या रिसॉर्टमध्ये अनेक सुविधा आहेत. याठिकाणी एक डस्टर गाडी आहे.  पोलिसांनी या रिसॉर्टमध्ये केलेल्या कारवाईत 45 किलो ड्रग्स सापडले. याची किंमत  145 कोटी आहे. ही बातमी फार चर्चेत आले नाही. हे रिसॉर्ट प्रकाश शिंदे यांच्या मालकीचे आहे. या शेडचा मालक गोविंद सिंदकर.आहे. याच्या शेडची चावी ओंकार दिघे याने घेतली अशी माहिती गोविंद याने दिली. ओंकार दिघे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि सोडले. पोलिसांनी त्याला का सोडलं हे अजून माहीत नाही. मुंबई पोलिस त्याठिकाणी का गेले?, असे सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केले.

आणखी वाचा

Comments are closed.