सातारा डॉक्टर आत्महत्या प्रकरण; अंबादास दानवेंनी भाजपच्या रणजित निंबाळकरांचं नाव घेतलं
मुंबई : साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात (Satara Doctor Suicide) ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी माजी खासदार रणजित निबाळकर (Ranjit Nimbalkar), त्यांचा भाऊ आणि अजितदादांचा आमदार सचिन कांबळे यांच्यावर आरोप केले आहेत. हे तिघे मिळून तिथली यंत्रणा चालवतात, चुकीची कामे करण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव टाकतात असा आरोप अंबादास दानवे यांनी केला. तसेच महाडिक नावाच्या पोलीस निरीक्षकावरदेखील त्यांनी आरोप केला.
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील एका महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याने महाराष्ट्र हादरला आहे. आपल्यावर सातत्याने बलात्कार करण्यात आला, चुकीचे पोस्टमॉर्टम करण्यासाठी वरिष्ठांचा दबाव आल्याचा आरोप तिने सुसाईड नोटमध्ये केला. तसेच खासदाराच्या दोन पीएंनी दबाव टाकल्याचा आरोपही तिने केला आहे.
नेमका हाच धागा पकडून ठाकरेंचे नेते अंबादास दानवे यांनी भाजपचे माजी खासदार रणजित निंबाळकर, त्यांचा भाऊ अभिजीत निंबाळकर, राष्ट्रवादीचे आमदार सचिन कांबळे पाटील यांच्यावर आरोप केले.
Satara Woman Doctor Suicide : तर तिचा जीव वाचला असता
अंबादास दानवे म्हणाले की, “फलटण आत्महत्या प्रकरणातील युवतीवर राजकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांचा दबाव होता. महाडिक नावाच्या पोलीस निरीक्षकाचा त्यामध्ये समावेश आहे. त्याची 15 दिवसांपूर्वी नंदुरबारला बदली झाली आहे. त्याच्याकडे सदर डॉक्टर तरुणीचा तक्रार अर्ज आला होता. मात्र त्याने त्या तक्रारीला केराची टोपली दाखवली. त्याच्यावर तात्काळ निलंबन कारवाई करा. त्याने त्याचवेळी सदर अर्जाची दखल घेतली असती तर आज तिचा जीव वाचला असत.”
Phaltan Doctor Suicide : माजी खासदाराचा भाऊ यंत्रणा चालवतो
माजी खासदाराचा भाऊ अभिजीत निंबाळकर हा त्या ठिकाणी यंत्रणा चालवतो. अधिकाऱ्यावर दबाव टाकणे, त्यांना चुकीची कामे करायला लावणे हे धंदे करतो. त्याला साथ राष्ट्रवादीच्या सचिन कांबळे पाटील या आमदाराची आहे. त्या निंबाळकरच अधिकारांच्या दालनात काय काम असतं? या तिघांवर कारवाई करा. हे तिघे त्याठिकाणी यंत्रणा चालवत होते आणि चुकीची कामे करत होते असा आरोप अंबादास दानवे यांनी केला.
फलटण रणजित नाईक निंबाळकर रणजित निंबाळकरांवर आरोप
सचिन कांबळे पाटील हे अजित पवारांचे आमदार नाहीत, ते नावाला राष्ट्रवादीत आहेत. ते सगळं काम भाजपचं करतात असा आरोप दानवे यांनी केला. ते म्हणाले की, “आमदार सचिन कांबळे पाटील, माजी खासदार रणजित निंबाळकर आणि त्यांचा भाऊ अभिजीत निंबाळकर हे अधिकाऱ्यावर दबाव टाकतात आणि चुकीची कामे करायला लावतात. पोस्ट मार्टम सर्टिफिकेट त्यांच्या सोयीने द्या, चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल करा, राजकीय कार्यकर्त्यांवर चुकीची कलमे लावा असले उद्योग करत होते.”
या तिघांनी वाठार निंबाळकर वाखरी येथे उत्खनन केलेलं नसताना देखील एका शेतकऱ्यावर एक कोटी रुपयांचा बोजा चढवला आहे. याला जबाबदार कोण? असा प्रश्न दानवे यांनी विचारला. रणजित निंबाळकरांनी शरद पवारांची राष्ट्रवादी, आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते आणि आमच्या शिवसेनेचे कार्यकर्ते यांच्यावर चुकीच्या प्रकारे गुन्हे दाखल केले आहेत असाही आरोप दानवेंनी केला.
ही बातमी वाचा:
आणखी वाचा
Comments are closed.