व्हाईट हाऊस परिसरात पुन्हा गोळीबार, सिक्रेट सर्व्हिस अधिकारी आणि हल्लेखोरात चकमक
गेल्या आठवड्यात ट्रम्प हजर असलेल्या कार्यक्रमात गोळीबाराची थरारक घटना घडली होती. ही घटना ताजी असताना सोमवारी व्हाईट हाऊसच्या परिसरात आणखी एक गोळीबाराची घटना घडली. व्हाईट हाऊसच्या परिसरात बंदूकधारी व्यक्तीने सिक्रेट सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांवर गोळीबार केला. या चकमकीत संशयित व्यक्ती जखमी झाला. या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या.
अमेरिका सिक्रेट सर्व्हिसचे उपसंचालक मॅथ्यू क्विन यांनी घटनेबाबत माहिती दिली. वॉशिंग्टन डी.सी.मधील 15 वा मार्ग आणि इंडिपेंडन्स एव्हेन्यूच्या परिसरात ही घटना घडली. सिक्रेट सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांनी विचारपूस करण्यासाठी जवळ जाण्याचा प्रयत्न केला असता, त्या व्यक्तीने पळ काढत अधिकाऱ्यांच्या दिशेने गोळीबार केला. या एक पादचारी किरकोळ जखमी झाला आहे.
Comments are closed.