शफाली वर्माच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्डची नोंद! टी 20 आंतरराष्ट्रीयमध्ये धावांचा पाऊस पाडत रचला इतिहास

जपानमध्ये सुरू असलेल्या 20 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत मंगळवारी (22 सप्टेंबर) महिला क्रिकेट संघांचा अंतिम सामना खेळला गेला. निशिन येथे खेळल्या गेलेल्या या सुवर्णपदकासाठीच्या सामन्यात भारत आणि श्रीलंका समोरा-समोर आले. यामध्ये भारतीय संघाची सलामीवीर शफाली वर्माने आपला स्फोटक अंदाज कायम राखत एक विश्वविक्रम रचला आहे.
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकली आणि कर्णधार हरमनप्रीत कौरने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शफालीने स्मृती मानधनासोबत भारताच्या डावाला उत्तम सुरूवात केली. शफालीने पॉवरप्लेमध्ये उत्तम शॉट्स खेळत महिला टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
शफालीने टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक धावा करताना दक्षिण आफ्रिकेची दिग्गज लॉरा वॉल्व्हार्डला मागे टाकले आहे. लॉराने एका कॅलेंडर वर्षात 824 धावा केल्या होत्या. शफालीने तिला मागे टाकत 863 धावा केल्या आहेत. ती श्रीलंकेविरुद्ध 29 चेंडूंत 48 धावा करून बाद झाली.
महिलांच्या टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा
863 – 2026 मध्ये शफाली वर्मा (भारत*)
824 – लॉरा वोल्वार्ड (दक्षिण आफ्रिका) 2026 मध्ये
800 – नताशा माइल्स (हॉंग कॉंग) 2026 मध्ये
779 – ईशा ओझा (यूएई) 2025 मध्ये
779 – यास्मिन दासवानी (हॉंग कॉंग) 2026 मध्ये
आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 च्या अंतिम सामन्यात शफालीने स्मृतीसोबत पहिल्या विकेटसाठी 99 धावांची भागीदारी केली. दोघी महिलांच्या टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये 4000* धावांची भागीदारी करणारी पहिली जोडी ठरली आहे.
स्मृतीने 79 धावा आणि हरमनप्रीतने 19 धावा केल्या. तसेच ऋषा घोष 49 धावांवर नाबाद राहिली. श्रीलंकेचा डाव सुरू असून त्यांनी 11 षटकांत 54 धावसंख्येवर 7 विकेट्स गमावल्या आहेत. (Shafali Verma Creates World Record Most runs in a calendar year in Women’s T20Is INDvsSL Asian Games 2026)
Comments are closed.