लग्नाच्या नावाखाली अवघ्या 50 हजारात अल्पवयीन मुलीचा ‘सौदा’, शहापूर पोलिसांनी छापा घातला अन्…;
Shahapur Crime News शहापूर : ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील आदिवासी अल्पवयीन मुलींच्या लग्नाच्या नावाखाली विक्रीची धक्कादायक घटना समोर आली आहे. पालघरच्या (Palghar) वाडा तालुक्यात आदिवासी कातकरी समाजातील एका मुलीच्या लग्नाच्या नावाखाली तिची विक्री केल्याचे समोर आले होते. ठाणे जिल्ह्यात शहापूर तालुक्यातील आनंदवाडी, खैरे-शेणवा परिसरात गरीब आदिवासी कुटुंबातील अल्पवयीन मुलीचा विवाहाच्या नावाखाली ठरवण्यात आला होता. मुलाकडील कुटुंब लग्नाचा संपूर्ण खर्च करणार होते आणि त्यानंतर मुलीच्या आई-वडिलांना 50 हजार रुपये देणार होते, ज्यामध्ये मध्यस्थी करणाऱ्याचा वाटाही होता. ही माहिती मिळाल्यानंतर चाईल्ड हेल्पलाईन आणि किन्नवली पोलिसांनी संयुक्त कारवाईत रात्री उशिरा छापा टाकून बालविवाह रोखला.
Palghar Crime News: हातावर मेहंदी, चेहऱ्यावर हळद, वय अवघे 17 वर्षे 1 महिना 17 दिवस
मुलीच्या घरी 4 ऑक्टोबर रोजी हळदीचा कार्यक्रम सुरू असताना, चाईल्ड हेल्पलाईनवर गुप्त माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करून आनंदवाडी, खैरे-शेणवा येथील घरावर छापा टाकला. त्या वेळी मुलीच्या हातावर मेहंदी लावलेली व चेहरा पिवळसर दिसत असल्याने संशय वाढला. चौकशीत मुलीचे आधारकार्ड तपासले असता तिची वयोमर्यादा फक्त 17 वर्षे 1 महिना 17 दिवस असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मुलीच्या आई-वडिलांकडून हि बाब समोर आली की, ते दलाल प्रकाश नवसु मुकणे यांच्या माध्यमातून हा सौदा करत होते. पोलिसांच्या मते, हा प्रकार बालविवाह प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन असून विवाहाच्या नावाखाली मानवी तस्करीसारखा गंभीर अपराध आहे.
Shahapur Crime: आरोपींवर कठोर कारवाई करण्याची स्थानिकांची मागणी
सध्यामुलीला सुरक्षित ठेवण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. स्थानिकांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या गुन्ह्यात नवरा जय शिर्के, वडील लक्ष्मण शिर्के, आई आणि मध्यस्थी करणारा दलाल प्रकाश मुकणे यांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाची चौकशी सध्या किन्हवली पोलिस करत आहेत.
संगली गुन्हा: सांगलीत नवविवाहीतेनं संपवलं जीवन, पाच जणांविरोधात हुंडाबळीचा गुन्हा
इस्लामपूर शहरातील अंबाबाई मंदिर परिसरात राहणाऱ्या पंचवीस वर्षीय नवविवाहितेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे. लग्नानंतर कर्करोगाने त्रस्त असलेल्या सासूवर उपचार करण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये घेऊन यावेत, या कारणावरून मृत अमृता हिला घरच्यांनी शिवीगाळ करत मानसिक आणि शारीरिक जाच केला. पैशांसाठी तगादा लावला आणि त्यामुळे तिने हे पाऊल उचलल्याची तक्रार करण्यात आली आहे.
अमृताच्या कुटुंबाने दिलेल्या तक्रारीनुसार, सासरच्या आर्थिक आजाराच्या खर्चासाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा लावला जात होता आणि या तक्रारीतून तिने आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी सासरच्या पाच जणांविरोधात हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत नवविवाहितेचे नाव अमृता ऋषिकेश गुरव आहे. अकरा महिन्यांपूर्वी तिचा ऋषिकेश गुरव याच्याशी प्रेमविवाह झाला होता. ही घटना कोल्हापूरमध्ये घडल्यानंतर इस्लामपूर पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आली असून, पती, सासू आणि अन्य लोकांवर गुन्हा दाखल झाला आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.