शरद पवारांची ‘ती’ गुगली अन् अजिंक्य नाईक बनले MCA निवडणुकीच्या मैदानात चॅम्पियन, इनसाईड स्टोरी


मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे आणि क्रिकेट विश्वाचे लक्ष लागलेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनचे एम.सी.सी अध्यक्षपदाची निवडणूक अखेर बिनविरोध संपन्न झाली. शेवटच्या क्षणापर्यंत अटीतटीची वाटत असलेली एमसीएची निवडणूक बिनविरोध होऊन अजिंक्य नाईक अध्यक्षपदी विराजमान झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ऐनवेळी सर्वच उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतल्याने राजकीय डाव किंवा या निवडणुकीतील राजकारण बाजुला पडल्याचं दिसून आलं. त्यामुळे, शरद पवारांनी (Sharad Pawar) निवडणुकांपूर्वी टाकलेली गुगली या निवडणुकीतील राजकारणाची विकेट काढणारी ठरली. अजिंक्य नाईक (Ajinkya Naik) यांनी अध्यक्षपदी निवड होताच शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही आभार मानले आहेत.

मुंबई क्रिकेट असोसिएशन अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळालंविद्यमान अध्यक्ष अजिंक्य नाईक, आमदार प्रसाद लाड, आमदार जितेंद्र आव्हाड आणि विहंग सरनाईक हे शर्यतीत असताना, एमसीएचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी या निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाचे वक्तव्य केलं होतं. ‘क्रिकेटमध्ये राजकारणाचे जोडे बाजूला ठेवले पाहिजेत आणि ते देवेंद्र फडणवीस करतात’. त्यांनी कधीही क्रिकेटमध्ये राजकारण आणले नाही आणि हीच अपेक्षा आताही आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. राजकारणाचा गडद अभ्यास असलेल्या आणि निवडणुकांचा सर्वानुभव असलेल्या शरद पवारांनी आपल्या अनुभवातून शा‍ब्दिक गुगली टाकली होती. अखेर निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवारांची ही गुगली निवडणुकीचा अचूक वेध घेणारी ठरल्याचं दिसून येत आहे. कारण, ऐनवेळी भाजप-शिवसेना युतीचे नेते असलेल्या उमेदवारांनीही माघार घेतल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शब्द आणि शरद पवारांची ती गुगली अजिंक्य नाईक यांना एमसीएच्या मैदानात चॅम्पियन ठरवणारी ठरली, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

शरद पवारांकडून फडणवीसांचं कौतुक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे क्रिकेटच्या बाजुने उभे राहतील असे म्हणत शरद पवारांनी फडणवीसांचे कौतुक केले होते. विशेष म्हणजे अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या अजिंक नाईक आणि मुलगा विहिंगसाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनीही शरद पवारांची भेट घेतली होती. अजिंक्य नाईक यांनी भेट घेतल्यानंतरच शरद पवार यांनी अजिंक्य नाईक यांच्या उमेदवारीला पाठिंबा देत गुगली टाकली होती. ज्यामुळे निवडणुकीची दिशा स्पष्ट झाली आहे. दरम्यान, अजिंक देसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. त्यानंतर, राजकीय मतभेद बाजूला ठेवून मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत पवार-फडणवीस एकत्र आल्याने अजिंक्य नाईक बिनविरोध अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत.

शरद पवार अन् मुख्यमंत्री फडणवीसांची बैठक

राज्यातील मोठे राजकीय मतभेद असतानाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी पुन्हा एकदा मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीसाठी हातमिळवणी केली आहे. या महत्त्वपूर्ण राजकीय समझोत्यामुळे अजिंक्य नाईक यांची एमसीए अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. मागच्या निवडणुकीत देखील अशाच प्रकारे शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची हातमिळवणी झाल्याचं पाहायला मिळाल होतं. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्या, ज्यात पवार आणि फडणवीस यांच्यात सोमवारी सकाळी ‘वर्षा’ निवासस्थानी महत्त्वाची बैठक झाली होती. या चर्चेनंतर भाजप आमदार प्रसाद लाड, राष्ट्रवादी (एसपी) आमदार जितेंद्र आव्हाड, ubt सेनेचे (UBT सेना) मिलिंद नार्वेकर आणि विहंग सरनाईक या प्रमुख उमेदवारांनी आपली नावे मागे घेतली. सर्वपक्षीय नेत्यांच्या या सहमतीमुळे 12 नोव्हेंबर रोजी होणारी संभाव्य निवडणूक टळली आणि अजिंक्य नाईक यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला.

हेही वाचा

राष्ट्रवादीच्या प्रवक्ते पदावरुन हकालपट्टी, अमोल मिटकरींना सूचली शायरी, आमदाराची पहिली प्रतिक्रिया

आणखी वाचा

Comments are closed.