जरांगे पाटलांच्या आंदोलनामागे हात असल्याच्या आरोपावर शरद पवार स्पष्टच बोलले; म्हणाले, आमचा कवडी
मनोज जारानरेंज पाटीलवरील शरद पवार: मराठा आंदोलक मनोज जरेंगे पाटील मुंबईतील आझाद मैदानात (Azad Maidan) बेमुदत उपोषण सुरू केलं होतं. यानंतर मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील (Maratha Reservation) आठ मागण्यांपैकी सहा मागण्या राज्य सरकारने (Maharashtra Government) मान्य करत त्यासंदर्भात शासन निर्णय (जीआर) जारी केला. सरकारच्या या जीआरला ओबीसी संघटनांनी तीव्र विरोध केला आहे. तर मनोज जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवारांचा हात असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जात होता. आता या आरोपावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवार यांना मनोज जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवारांचा हात असल्याचा आरोप केला जातोय, याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, ज्याचा आमचा कवडीचाही सबंध नाही. त्यावर काही भाष्य करण्याची गरज नाही. ते सत्यावर आधारित नाही. त्यामुळे त्यावर भाष्य नको, असे प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
सरकार कुठल्याही जाती-धर्माचे नसावे
सरकारने काढलेल्या जीआरमुळे मराठा समाजाचा लाभ होईल असे वाटते का? याबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले की, अ-ब-क असा विचार न करता सर्वांनी एकत्र येऊन विचार केला पाहिजे. सरकारने असे करणे योग्य नाही. एक कमिटी एका मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली, दुसरी कमिटी दुसऱ्याच्या अध्यक्षतेखाली आहे. सरकार कुठल्याही जाती-धर्माचे नसावे. सरकार सर्वांचे असावे. सरकार व्यापक असावे. कोणतीही कमिटी एका जातीची करु नका, ती समाजाची करा. माझा सांगण्याचा उद्देश असा आहे की, सामाजिक ऐक्य हवे, त्यात अंतर नको, असे त्यांनी म्हटले.
राष्ट्रवादीचा उद्या नाशिकमध्ये मोर्चा
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने नाशिकमध्ये रविवारी (दि. 14 सप्टेंबर) एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत विचारले असता नाशिकला शिबिर घ्यावे, असा नाशिकच्या सहकार्यांचा आग्रह होता. लोकसभा निवडणुकीत तीनही खासदारकीच्या जागा आम्हाला दिल्यात. स्थानिक जनतेशी सुसंवाद कसा करता यावा? यासाठी नाशिक निवडले. याआधी ही राज्य पातळीचे कार्यक्रम नाशिकला झाले आहेत. आज देशांत, राज्यात जी स्थिती आहे, त्याचा आढावा घेणे, पुढे काय करायचे? हे ठरविण्यासाठी आजचे शिबिर आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, सरकारचे धोरण याबाबतीत उद्या मोर्चा काढणार आहोत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.