शरद पवारांचं पंतप्रधान मोदींच्या निवृत्तीविषयी महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक

मराठी & Sharad Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नुकतेच दिल्लीत जाऊन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटले होते. एकनाथ शिंदे यांच्या या दिल्लीवारीची प्रचंड चर्चा झाली होती. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. एकनाथ शिंदे  यांना मी अनेक वर्षांपासून ओळखतो. त्यांचा एक स्वभाव आहे, ते कधीच बोलत नाहीत. त्यांची पुढची वाटचाल कशी असेल याचा अंदाज लवकरच येईल, असे शरद पवार यांनी म्हटले होते. शरद पवार यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले होते. एकनाथ शिंदे हे आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ घडवणारी भूमिका घेणार का, याचीही चर्चा रंगली आहे.

शरद पवार यांच्या या वक्तव्यावर एकनाथ शिंदे यांनी रविवारी ठाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, शरद पवार ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत. आमची वाटचाल जी आहे ती बाळासाहेबांचे विचार आणि विकास यांची आहे. मी दिल्लीत कुठे गेलो होतो हे सगळ्यांना माहिती आहे. मी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना भेटलो. आमची वाटचाल सरळ आहे, आम्ही कधीच तिरकस जात नाही.

शरद पवार चालू पंतप्रधान मार्ग: शरद पवारांचं पंतप्रधान मोदींच्या निवृत्तीविषयी महत्त्वाचं वक्तव्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या काही दिवसांत वयाची पंचाहत्तरी ओलांडणार आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नियमाप्रमाणे निवृत्त होणार का, अशी चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी म्हटले की, आरएसएस ही एक शिस्तबद्ध संघटना आहे. एकदा निर्णय झाला तर त्याची चर्चा होत नाही, अंमलबजावणी होत असते. 75 वर्षे निवृत्ती वयाच्या बाबतीत शिस्तीचे पालन होईल, अशी अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्त केली.

Sharad Pawar on Ajit Pawar: अजितदादांसोबत एकत्र येणार का? शरद पवार म्हणाले…

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. याबाबत शरद पवारांना विचारले असता त्यांनी म्हटले की, आम्ही विचारांसोबत जातो. भाजपसोबत कुणी जात असेल तर त्यांच्यासोबत आम्ही नाही.  आमच्याकडे दुसऱ्या फळीतील सर्वजण पक्षाला मजबूत करण्यासाठी सक्षम आहेत. कुणीच कमजोर नाही, असे शरद पवार यांनी म्हटले.

https://www.youtube.com/watch?v=mue5ocbbkce

आणखी वाचा

रोज खोटं बोलायचं अन् पळून जायचं, हे पळपुटे लोक…. फडणवीसांचं शरद पवारांना प्रत्युत्तर

आणखी वाचा

Comments are closed.