शेअर मार्केट क्रॅश होण्याची भीती खरी ठरली, बाजार उघडताच सेन्सेक्स 800 अंकांनी कोसळला
मुंबई: अमेरिका, जपान आणि कोरियाच्या बाजारानंतर भारतीय शेअर मार्केट देखील क्रॅश झालं आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर सेन्सेक्स 821 अंकांनी घसरला. तर निफ्टी 50 मध्ये देखील घसरण झाली आहे. सेन्सेक्स 821 अंकांनी घसरुन 73421 अंकांवर आला. निफ्टी 50 मध्ये 286 अंकांची घसरण होऊन तो 23080 पर्यंत पोहोचला.
इराण आणि इस्त्रायलमध्ये पुन्हा युद्धाचा भडका उडाला आहे. यामुळं वाढलेला तणाव, अमेरिका आणि इराण युद्धाची तीव्रता वाढण्याची शक्यता असल्यानं सोमवारी भारतीय शेअर बाजार क्रॅश होण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. ती भीती खरी ठरली आहे.
गिफ्ट निफ्टीतून घसरणीचे संकेत
गिफ्ट निफ्टीमध्ये देखील आज घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. गिफ्ट निफ्टी फ्यूजर्स गिफ्ट निफ्टी 23096 अंकांवर पोहोचला होता. त्यामुळं भारतीय शेअर बाजारात आज मोठी घसरण होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता.
आशियाई बाजारातही घसरण
दक्षिण कोरियातील कोस्पीमध्ये सुरुवातीला 7 टक्के घसरण झाली आहे. हाँगकाँगचा हेंग सेंग निर्देशांक 1.92 टक्क्यांनी घसरला. चीनच्या CSI 300 निर्देशांकात 1.5 टक्क्यांची घसरण झाली. तर, जपानचा निक्केई 225 निर्देशांक 4.6 टक्क्यांनी घसरला.
इराण इस्त्रायलमध्ये संघर्ष पुन्हा तीव्र
इराणनं इस्त्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा केल्यानं अमेरिका आणि इराणमधील शस्त्रसंधीवर संकट निर्माण झालं आहे. इस्त्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा करण्यापूर्वी इराणच्या संसदेचे अध्यक्ष एमबी घालीबाफ यांनी अमेरिकन नौदलानं केलेली नाकाबंदी आणि लेबनॉनशी संबंधित करारांचं उल्लंघन केलं जातंय.
कच्चा तेलाच्या दरात वाढ
इराण आणि इस्त्रायल यांच्यातील संघर्ष वाढल्यानं तेलाच्या दरात वाढ झाली. ब्रेंट क्रूड फ्यूचर्स 3.18 टक्क्यांनी वाढून 96.05 डॉलरर्सवर पोहोचले. तर, अमेरिकन वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट फ्यूचर्स 3.46 टक्क्यांनी वाढून 93.67 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत.
डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर
भारतीय शेअर बाजारात घसरणीचं चित्र पाहायला मिळालेलं असताना अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयात देखील घसरण झाली आहे.डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर झाला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया 34 पैशांनी कमजोर होत 95.32 रुपयांवर खुला झाला.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं गेल्या आठवड्यात रेपो रेट जाहीर करताना त्यात कोणताही बदल केला नव्हता. मात्र, आर्थिक वर्ष 2026-27 साठी महागाईचा अंदाज वाढवून 5.1 टक्के केला आहे. याशिवाय जीडीपी वाढीचा दर 6.6 टक्के केला आहे. यामुळं गुंतवणूकदार सतर्क झाले आहेत.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Ladki Bahin Yojana Beneficiary List Check : लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव हटवलं तर नाही ना? चेक करा!
Comments are closed.