महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? ठाकरेंचे दोन आमदार सोडले तर सर्वच आमदार शिवसेनेच्या संपर्कात,

शिवसेना संकट: शिवसेनेच्या फुटीनंतर लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्या महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) घवघवीत यश मिळवले होते. तर भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महायुतीला (Mahayuti) पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर विधानसभा निडवणुकीत (Vidhan Sabha Election) महायुतीने महाविकास आघाडीचा दारुण पराभव केला. आता मुंबई महानगर पालिका निवडणुकीपूर्वी (BMC Election) महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे.

शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार कृपाल तुमाने यांनी एक मोठा दावा करत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आणले आहे. त्यांनी म्हटलंय की, उद्धव ठाकरे गटातील दोन आमदार सोडले, तर उर्वरित सर्व आमदार शिवसेनेच्या (शिंदे गट) संपर्कात आहेत आणि लवकरच पक्षप्रवेश करणार आहेत.

दसऱ्यानंतर होणार पक्षप्रवेश?

अनेक आमदार संजय राऊत यांच्या भूमिकेवर नाराज आहेत, असा दावा देखील कृपाल तुमाने यांनी केलाय. दसरा हा शिवसेनेसाठी महत्त्वाचा दिवस असतो आणि याच दिवशी अनेकदा पक्षाच्या मोठ्या घोषणा झाल्या आहेत. यावेळीही दसऱ्यानंतर मोठा पक्षप्रवेश सोहळा होणार असल्याचे संकेत देखील कृपाल तुमाने यांनी दिले आहेत.

बीएमसी निवडणुकीपूर्वी ठाकरेंना मोठा धक्का?

दरम्यान, मुंबई महानगर पालिका निवडणुकीपूर्वी या प्रकारचा आमदारांचा ओघ हा राजकीय समीकरणं बदलणारा ठरू शकतो. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (ठाकरे गट) आधीच आव्हानात्मक परिस्थितीत आहे, आणि अशा वेळी आणखी आमदारांनी पक्षाला जय महाराष्ट्र केले तर हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का ठरू शकतो.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

इतर महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime news Ayush Komkar: पुण्यातील आयुष कोमकर हत्याप्रकरणात मोठी अपडेट, बंडू आंदेकरसह सहा जणांना अटक, पळण्यापूर्वीच मुसक्या आवळल्या

Pune Crime Ayush Komkar: दुडम काकांचा फोन आला, मोठ्या मुलाला मारहाण…आयुषची आई धावत खाली गेली’, लेक रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहून हंबरडा फोडला; त्या दिवशी नेमकं काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.