नाथांचा नाथ एकनाथ मदतीला धावला, संतोष बांगरांच्या आईच्या हृदयात तीन ब्लॉकेज, एकनाथ शिंदेंनी एअर
मराठी : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) यांच्या संवेदनशील स्वभावाचा प्रत्यय आमदार संतोष बांगर यांना आला आहे. संतोष बांगर (Santosh Bangar) यांच्या आई वत्सलाबाई बांगर यांना हृदयात तीन ब्लॉकेज झाले आहेत. याबाबत एकनाथ शिंदे यांना माहिती मिळताच त्यांनी तत्काळ हिंगोलीमध्ये एअर अॅम्ब्युलन्स पाठवत संतोष बांगर यांच्या आईंना मुंबईत आणले. संतोष बांगर यांच्या आईंवर मुंबईत उपचार सुरु करण्यात आले आहेत.
संतोष बांगरांच्या आईच्या हृदयात तीन ब्लॉकेज
शनिवारी रात्री हिंगोली जिल्ह्यात वत्सलाबाई बांगर यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. वैद्यकीय तपासणीत हृदयात तीन ब्लॉकेजेस असल्याचे निदर्शनास आले. स्थानिक डॉक्टरांनी रुग्णांची स्थिती लक्षात घेता मुंबईत तातडीने हलवण्याचा सल्ला दिला. मात्र, रस्त्याने प्रवास करणे अत्यंत जोखमीचे असल्यामुळे, आमदार संतोष बांगर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी थेट संपर्क साधला.
शिंदेंची तातडीने मदत; एअर अॅम्ब्युलन्सची व्यवस्था
बांगर यांचा फोन मिळताच, एकनाथ शिंदे यांनी त्वरित नांदेड येथे खासगी एअर अॅम्ब्युलन्स पाठवली. वत्सलाबाई यांना या अॅम्ब्युलन्समधून मुंबईतील लीलावती रुग्णालयात हलवण्यात आले. विशेष म्हणजे, एकनाथ शिंदे स्वतः मुंबई विमानतळावर उपस्थित राहून वत्सलाबाई यांची विचारपूस केली आणि उपचारांची व्यवस्था पाहिली.
माझ्या आईला तीन ब्लॉकेजेस निघाले.. तातडीने पुढील उपचारासाठी मुंबईला जाण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री @mieknathshinde यांनी #एअर_बुलन्स पाठवली.. स्वतः विमानतळावर येऊन आईच्या तब्येतीची विचारपूस करून धीर दिला..
मनापासून धन्यवाद साहेब. pic.twitter.com/otrx8lx8aw
— आमदार संतोष बांगर (@santoshbangar_) ऑगस्ट 24, 2025
संतोष बांगर भावूक
या प्रसंगामुळे आमदार संतोष बांगर भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले. बांगर यांनी ट्विटरवरून आपल्या भावना व्यक्त करत म्हटले आहे की, माझ्या आईला तीन ब्लॉकेजेस निघाले. तातडीने पुढील उपचारासाठी मुंबईला जाण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एअर अॅम्ब्युलन्स पाठवली. स्वतः विमानतळावर येऊन आईच्या तब्येतीची विचारपूस करून धीर दिला. मनापासून धन्यवाद साहेब, असे त्यांनी म्हटले आहे.
प्रत्येक शिवसैनिक माझ्यासाठी कुटुंबाचा भाग, शिंदेंची प्रतिक्रिया
याबाबत प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, “प्रत्येक शिवसैनिक आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य माझ्यासाठी कुटुंबासारखेच आहेत. संकटाच्या वेळी त्यांच्या पाठीशी उभे राहणे हे माझे कर्तव्य आहे. ही मदत मी कोणत्याही पदामुळे नव्हे, तर कर्तव्य भावनेतून केली आहे,” असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, लीलावती रुग्णालयात दाखल झाल्यानंतर वत्सलाबाई यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.