शिवसेना पक्ष अन् चिन्हाची सुनावणी, सुप्रीम कोर्टात आज काय घडलं; शिंदेंच्या खासदाराने सांगितलं
मुंबई : शिवसेना (Shivsena) पक्ष आणि चिन्हासंदर्भातील सुनावणी आता अंतिम टप्प्यात आहे, पण सर्वोच्च न्यायालयात तारीख वेतन स्ट्रीच नाहीत काहीसं पाहायला मिळत आहे. त्यावरुनशिवसेना ठाकरे गटाने नाराजी व्यक्त केली असून ठाकरेंच्या वकिलांनीही बाजू मांडली आहे. आता, शिवसेना शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी न्यायालयात आज काय घडलं, याची माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयामध्ये (court) आज शिवसेना पक्ष आणि चिन्ह याबद्दल सुनावणी पण झाले असते पण, न्यायमूर्ती यांच्याकडे दुसरा महत्त्वाचा खटला होता म्हणून त्यांनी आजची सुनावणी घेतली नाही. पुढील सुनावणी 12 नोव्हेंबर रोजी होणार आहे, तशी न्यायालयाने पुढची तारीखही दिली आहे. मात्र, ही तारीख दिल्यानंतर ठाकरे गटाचे लोक लोकांची दिशाभूल करत आहेत. जेव्हा 12 नोव्हेंबरची तारीख दिली तेव्हा दोन्ही बाजूने याला मान्यता देण्यात आली. आमचे वकील आणि त्यांचे वकील अशा दोघांच्या संमतीने ही तारीख देण्यात आल्याचे शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे (Rahul shwale) यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले?
सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा नवी तारीख दिल्याने शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यावरुनखासदार राहुल शेवाळे यांनी पक्षाची भूमिका मांडली. शिवसेना बैल गटाचे नेते एकीकडे संविधानाचा सन्मान करावा अशी भूमिका मांडतात आणि दुसरीकडे सर्वोच्च कोर्ट जे नियमानुसार काम करते त्यांच्याबद्दल असं बोलायचं. कुठल्याही पक्षाचे चिन्ह आणि नाव हे त्याच्या मतदानाच्या आधारावर असतं. त्यावेळीच्या खासदारांची संख्या आणि आमदारांची संख्या यांच्या मतदानावर हे निर्णय झालेला आहे, तो निवडणूक आयोगाने निर्णय दिला, असे शेवाळे यांनी म्हटले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये या चिन्हाबद्दल गोंधळाचा वातावरण निर्माण व्हावे यासाठी हे शंका उपस्थित होत आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार चिन्ह आणि पक्ष हे एकनाथ शिंदे यांच्याकडे राहीलअसा मला विश्वास आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत संभ्रम निर्माण व्हावा यासाठी ठाकरे गटाचा प्रयत्न असतो. त्यासाठीच उबाठाचे वकील आणि लोकप्रतिनिधी हे चुकीच्या भाषेत न्यायालयाचा उल्लेख करत आहेत. त्यांच्या बाजूने निकाल लागला तर सर्वोच्च कोर्ट चांगलं आणि त्यांच्या विरोधात निकाल दिला तर सर्वोच्च कोर्ट वाईट? अशी ठाकरे गटाची भूमिका असल्याचं शेवाळे यांनी म्हटलं?
निवडणूक आयोगातील घटनेच्या आधारावरच हे चिन्ह आणि पक्ष आहेत, घटनेनुसारच हे काम झालं आहे. ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगावर यापूर्वीसुद्धा आरोप करण्यात आले होते. पण, निवडणूक आयोगाने नियमानुसारच काम केले आहे. आपण त्यांचं वक्तव्य पाहाल तर त्यांचे लोकप्रतिनिधी अगदी खालच्या भाषेत न्यायाधीशांबद्दलसर्वोच्च न्यायालयाबद्दल बोलत आहेत. अर्वाच्या भाषा वापरून टीका करत आहेत, त्यांचं तोंड सुटला आहे, असे राहुल शेवाळे यांनी म्हटलं?
काय म्हणाले खासदार अरविंद सावंत
पक्षांतर्गत बंदी कायदा असूनही त्याची धज्जीया सरन्यायाधीश चंद्रचूड पासून उडवल्या गेली. आता चौथे न्यायाधीश आहे, ज्यांच्या समोर सुनावणी आहे बघू आज प्रकाश किरण उजाडतो का? चंद्रचूड यांनी राज्यपाल यांच्यावर ताशेरे ओढले होते, त्यांचे निर्णय संविधानिक नाही असे बोलले होते. त्यामुळे कोणत्या आधारावर आमचं चिन्ह आणि पक्ष त्यांना दिलं. ज्या शर्ती घातल्या त्या पूर्ण आम्ही केल्या, तरीही चिन्ह आणि पक्ष त्यांना देताय.त्यांचं सदस्य रद्द व्हायला पाहिजे. कालबद्ध काळात निर्णय द्यायला पाहिजे. देशात लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. सगळ्या संस्था कशा वागताय बघा, असंही शिवसेना ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा
होय, निलेश घायवळच्या भावाला पडताळणीनंतरच शस्त्र परवाना दिला; गृहराज्यमंत्री योगेश कदमांची कबुली
आणखी वाचा
Comments are closed.