सामनाला आता ‘धर्मवीर’मधून मिळणार उत्तर, आता शिवसेना शिंदे गटाचं धर्मवीर हे ‘मुखपत्र’ सुरु होणार
सोलापूर : मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( मराठी) यांच्या शिवसेनेचे (Shiv Sena) आता मुखपत्र येणार आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या ‘सामना’ (Saamana) या मुखपत्राला ‘धर्मवीर’ (Dharmaveer) या शिवसेना शिंदे गटाच्या मुखपत्रातून उत्तर मिळणार आहे. उद्या (9 फेब्रुवारी) एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने धर्मवीर या मुखपत्राची मुंबईत स्थापना होणार आहे. मासिक स्वरुपात धर्मवीर हे मुखपत्र 10 फेब्रुवारीपासून प्रसिद्ध होणार असल्याची माहिती अक्षय महाराज भोसले यांनी दिली आहे.
धर्मवीर मुखपत्राची संपादकपदाची जबाबदारी अक्षय महाराज भोसले यांच्याकडे
संजय राऊत यांच्या कार्यकारी संपादकपदी असणाऱ्या सामना या शिवसेना ठाकरे गटाच्या मुखपत्राला आता शिंदेच्या धर्मवीर या मुखपत्रातून आव्हान दिले जाणार आहे. शिंदेच्या धर्मवीर या मुखपत्रातून पक्षाची धोरणे तसेच इतरही महत्वाचे निर्णय आणि भूमिका जाहीर होणार आहेत. या मुखपत्राची संपादक पदाची जबाबदारी अक्षय महाराज भोसले यांनी घेतली आहे. त्यामुळं शिवसेनेच्या मुखपत्रातून आता थेट सामनामधील ठाकरे शैलीला आव्हान दिले जाणार असल्याचे अक्षय महाराज भोसले यांनी सांगितले.
अधिक पाहा..
Comments are closed.