गद्दार खासदार नागेश पाटील आष्टीकर मुर्दाबाद…, नांदेडमध्ये प्रतिकात्मक पुतळा जाळत शिवसैनिकांकडून निषेध

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सहा खासदार गायब झाल्यानंतर नांदेड येथील शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर एकत्र येवून खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करुन त्यांचा निषेध केला.

शिवसेनेचे सहा खासदार गायब झाल्यानंतर नांदेड शहरात शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला. गेल्या दोन दिवसांपासून शिवसैनिकांतील ही नाराजी आज अखेर रस्त्यावर उतरली. आज दुपारी शहरातील शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ एकत्र येत प्रचंड घोषणाबाजी केली. गद्दार खासदार नागेश पाटील मुर्दाबाद, शिवसेना अंगार है, बाकी सब भंगार है, जय भवानी जय शिवाजी, शिवसेना के गद्दारोकों, जुते मारो सालोकों, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विजय असो, या घोषणांनी पुतळ्याचा परिसर दुमदुमला. यावेळी सुरुवातीला गद्दार खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या पुतळ्याला जोडे मारण्यात आले आणि निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.

या आंदोलनात तालुकाप्रमुख सुनिल पाटील कदम, नांदेड दक्षिणचे महानगरप्रमुख मनोज यादव, भाया शर्मा, डॉ.बालाजी पेनूरकर, लालचंद यादव, राजू यादव, नवनाथ जोगदंड, अशोक वाघमारे, अमजद लाला, परवेज खान, अंकुर पटेल, साईनाथ आलमखाने, करण इटनकर, अशोक पावडे, किरण जाधव यांच्यासह असंख्य शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.

Comments are closed.