उबाठा गटाच्या प्रत्येकाला बोभाटा करण्याची सवय; मातोश्रीवर काळी जादू; संजय शिरसाटांची बोचरी टीका

विनायक राऊत यांच्यावर संजय शिरसाट : उबाठा गटाच्या प्रत्येक जणाला अशी बोभाटा करण्याची सवय आहे. मातोश्रीवर काळी जादू करण्यासाठी बंगालचा जादूगार येत असतो. विनायक राऊत त्यामध्ये मास्टर आहेत. त्यांनी अशा प्रकारे स्वतःच्या सुनेचे केस कापणे ते अत्यंत भयानक आहे. स्वतः जादूटोण्याच्या विरोधात बोलतात आणि स्वतः जादूगाराला सोबत ठेवतात, दुटप्पी लोकांवर गुन्हे दाखल व्हायला हवेत्यामुळे. सुनेने गुन्हा दाखल केला, असाच सरकारने सुमोटो कारवाईची आदेश द्यायला हवेत. अशी मागणी शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केली आहे. माजी खासदार आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे (Shivsena UBT) ज्येष्ठ नेते विनायक राऊत (Vinayak Raut) यांची सून गिरीजा राऊत यांनी केलेल्या आरोपांवर बोट ठेवत मंत्री संजय शिरसाट यांनी टीका केली आहे. (विनायक राऊत यांच्यावर संजय शिरसाट)

दरम्यानएकनाथ खडसे यांना अमित शाह यांनी बोलावले ते नाही, हे मला माहित नाही. मात्र निवडणुकीच्या आधी ते गेले होते. मात्र काय तिथे झालं हे पक्षाच्या अंतर्गत वावड्या उठल्या होत्या. एकनाथ खडसे यांचा भाजपमध्ये प्रवेश आहे, त्यामुळे काय घडलं आम्हाला माहित आहे. असेही मंत्री संजय शिरसाट म्हणाले.

संजय शिरसाट :…पण देवी-देवतांना मध्ये घेऊन असे वक्तव्य न्यायाधीशाने करणं, मला योग्य वाटलं नाही

दरम्यान निदा खान धर्मांतर प्रकरणात निदा खानला तुम्ही माणुसकीच्या नात्याने सहकार्य केलं, यात काही संशय नाही, करा मदत. ती गर्भवती आहे. तिला मदत करा, परंतु तिने ज्या पद्धतीने इतरांचे आयुष्य उध्वस्त केले याचा विचार करा आणि या प्रकाराला तुम्ही देवीदेवतांचे नावे लावून, श्रीकृष्णांची उदाहरण देऊन निर्णय देत असाल तर हे हिंदूंना सहन होणार नाही. तुम्ही निकाल देताना तिची असलेली जी अवस्था आहे त्या विषयावर निकाल दिला असता तर आम्हाला अडचण नव्हती. मात्र देवी देवतांना मध्ये घेऊन असे वक्तव्य न्यायाधीशाने करणं, मला योग्य वाटलं नाही. असेही मंत्री संजय शिरसाट म्हणाले.

बहुतेक रेल्वेमध्ये जे भरती झालेले आहेत, यापूर्वीचे ते सर्व हिंदी भाषिक आहेत. काही टक्के लोक मराठी त्यामध्ये आहेत. म्हणून तुम्ही कोणत्याही रेल्वेमध्ये कोणत्याही टीसीला विचारलं तर ते हिंदीतच बोलतील आणि मग एखाद्या माणसाने स्वाभिमानाने मराठीत बोललं तर त्याला एक तास बसून ठेवलं, असे प्रकार महाराष्ट्रात घडत असतील तर याचा गांभीर्याने आम्हाला विचार करावा लागेल. असेही असेही मंत्री संजय शिरसाट म्हणाले.

Sanjay Shirsat : बच्चू कडू यांचे वैयक्तिक मत, त्या बातम्यांना आम्ही सिरीयस घेत नाही

संजय राऊत बावचळलेला माणूस आहे. हा नवीन पोपट झाला, या पोपटाणे स्वतःच्या UBT पक्षाचे भविष्य सांगावं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भविष्य सांगावं, दुसऱ्याच्या घरात डोकावून उगीच वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. बच्चू कडू यांचे वैयक्तिक मत आहे. परंतु अशा बातम्या दररोज येत असतात, त्या बातम्यांना आम्ही सिरीयस घेत नाही. असेही मंत्री संजय शिरसाट म्हणाले.

Sanjay Shirsat : बाबा फरजान हा एकेकाळचा डॉन असला तरी सर्वसामान्य माणसाच्या लोकांचा विचार करायचा

डॉन बाबा फरजान हा एकेकाळचा डॉन असला तरी सर्वसामान्य माणसाच्या लोकांचा विचार करायचा, त्याने अनेक राउंड फायर केले होते, त्याची छबी हिंदू नेता म्हणून पुढे आली, अनेक लोकांनी त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. मयत डॉनच्या घरी आढळलेले शस्त्रांचे परवाने आहेत. मयत झाल्यानंतर एक महिन्यानंतर कारवाई काय होते? हा विचार करावा. सीसीटीव्ही समोर आल्यानंतर आतली बाब समजेल, 18 तास का लागले? पोलिसांना तपासाला एवढा वेळ का लागला? याची माहिती आम्ही घेऊ. असेही मंत्री संजय शिरसाट म्हणाले.

Comments are closed.