ठाकरे गटाचे मुंबईतील नगरसेवक ‘गितेश विनायक राऊत’ कोण? पत्नीने केले कौटुंबिक छळ अन् अघोरी पूजेचे
मुंबई: शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्या सूनेने त्यांच्याविरोधात गंभीर आरोप करत गुन्हा दाखल केला आहे. विनायक राऊत, त्यांचा मुलगा गितेश, (Gitesh Raut) विनायक राऊत यांची पत्नी यांच्यासह सात जणांविरोधात हा गुन्हा दाखल आहे. विनायक राऊत (Vinayak Raut) हे शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचा मुलगा गितेश यांची पत्नी सध्या घोडबंदर येथील चितळसर मानपाडा भागात वास्तव्यास आहे. १० जून यादिवशी त्यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात राऊत कुटुंबाविरोधात तक्रार दाखल केली होती. (Vinayak Raut)
विनायक राऊत यांच्या सुनेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, २०१६ मध्ये विवाह जुळविणाऱ्या संस्थेकडे त्यांनी नोंदणी केली होती. या नोंदणीनंतर त्यांना विनायक राऊत यांचा मुलगा गितेश यांच्यासोबत विवाह जुळला. डिसेंबर २०१७ मध्ये विवाह झाल्यानंतर मुंबईत बंगला असल्याची खोटी माहिती दिल्याचा दावा तक्रारीत केला. त्यानंतर पतीने तिच्याशी वैवाहिक संबंध ठेवण्यास टाळाटाळ केली. याबाबत जाब विचारल्यास शिवीगाळ, मारहाण आणि मानसिक छळ केल्याचा आरोपही तिने केला आहे. तसेच सिंधुदूर्ग येथे नेऊन अघोरी पूजा,जादूटोणा सारखे अघोरी कृत्य केल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
Who is Gitesh Raut: कोण आहेत गितेश विनायक राऊत?
गितेश राऊत हे विनायक राऊत यांचे सुपूत्र आहेत. गितेश राऊत हे शिवसेना ठाकरे गटाने नेते असून सध्या मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. ८९ चे नगरसेवक आहेत. त्यांच्या पत्नीने सध्या त्यांच्या विरोधात अनेक गंभीर आरोप केले आहेत. मानसिक, शारीरिक छळासोबतच अघोरी गोष्टीचा देखील त्यांच्या पत्नीने माध्यमांसमोर बोलताना उल्लेख केला आहे. गितेश राऊत यांचे पालनपोषण मुंबईत झाले असून, त्यांच्या वडिलांच्या राजकीय कारकीर्दीचा त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव असल्याचे दिसून येते. गितेश राऊत यांनी प्रामुख्याने आपल्या वडिलांच्या राजकीय क्षेत्रात सक्रिय सहभाग घेतला होता. ते मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक (Corporator) म्हणून कार्यरत होते. शिवसेनेच्या स्थानिक राजकारणात त्यांनी काही काळासाठी सक्रीय भूमिका बजावली होती.
Who is Vinayak Raut: विनायक राऊत कोण आहेत?
विनायक राऊत रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचे माजी खासदार आहेत. उद्धव ठाकरेंचे विश्वासू शिलेदार अशी त्यांची ओळख आहे. एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडानंतरही त्यांनी ठाकरेंची साथ सोडली नाही. तळकोकणात राणे कुटुंबाला भिडत शिवसेना जिवंत ठेवण्याचं काम त्यांनी केलं. २०१४ आणि २०१९ मध्ये त्यांनी नारायण राणेंचे पुत्र नितेश राणेंचा पराभव केला. दोन टर्मचे खासदार असलेले विनायक राऊत यांनी मुंबई महापालिकेतून राजकारणाला सुरुवात केली. १९८५ ते १९९२ या कालावधीत ते नगरसेवक होते. त्यानंतर १९९९ मध्ये त्यांनी विलेपार्ले विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. ती जिंकून ते आमदार झाले. २००५ मध्ये त्यांची शिवसेनेचे सचिव म्हणून वर्णी लागली. २०१२ ते २०१४ या कालावधीत ते विधान परिषदेचे सदस्य होते. २७ मे २०१४ रोजी त्यांनी विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिला. २०१४ मध्ये त्यांनी पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे नेते नितेश राणेंचा दीड लाख मतांनी पराभव केला. त्यावेळी राणे विद्यमान खासदार होते. २०१९ मध्ये त्यांनी नितेश राणेंचा पुन्हा एकदा पराभव केला. त्यावेळी राणे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार होते. राऊत यांनी ही निवडणूक पावणे दोन लाख मतांनी जिंकली.
उद्धव ठाकरेंचे निष्ठावंत नेते अशी विनायक राऊत यांची ओळख आहे. शिंदेंच्या बंडानंतर पक्षात सर्वात मोठी फूट पडली. राज्यात सत्तापालट झाला. चाळीस आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली. बहुसंख्य खासदारही शिंदेंसोबत गेले. पण विनायक राऊत ठाकरेंसोबत राहिले. ठाकरेंनी पक्ष, चिन्ह गमावलं असलं तरीही ते ठाकरेंसोबत कायम आहेत.
नेमकं प्रकरण काय़?
शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena UBT) ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut), त्यांचा मुलगा आणि मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवक गितेश राऊत (Gitesh Raut) यांच्यासह संपूर्ण कुटुंबाविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनायक राऊत यांची सून गिरीजा राऊत (Girija Raut) यांनी दिलेल्या तक्रारीवरून ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यामध्ये कौटुंबिक छळासोबतच ‘जादूटोणा विरोधी कायद्यान्वये’ गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. तर या प्रकरणी राऊत यांची सून गिरीजा राऊत (Girija Raut) यांनी आज माध्यमांसमोर येऊन त्यांच्यांसोबत घडलेली सर्व आपबिती सांगितली आहे. यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की, त्यांनी आमची फसवणूक केली, लग्नाआधी सांगितलेल्या सर्व गोष्टीवेगळ्या होत्या. लग्नानंतरचं पूर्ण चित्र वेगळं होतं. प्रत्येक दृष्ट्या आर्थिक, मानसिक, शारिरीक भावनात्मक छळ असं गितेश आणि त्याच्या परिवाराकडून छळ करण्यात आला, सात वर्ष त्यांनी छळ करून माझा आणि माझ्या परिवाराचा घात केला आहे.
Girija Raut : आम्ही आंनदाने राहू असं वाटतं होतं, पण
पुढे त्या म्हणाल्या की, राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे एक मोठा परिवार असल्याने आणि मला नेहमी गितेशबरोबर चांगला संसार करण्यासाठी म्हणून आम्ही कधीच तक्रार केली नव्हती, आज ना उद्या सगळं बदलेल या आशेवरती, आम्ही आंनदाने राहू असं वाटतं होतं, पण असं काही घडलं नाही, त्याचबरोबर त्यांनी सांगितलेलं घर फ्लॅट, पैसे वगैरे, जे काही सांगितलेलं आहे ते नितांत खोटं आहे, त्याने जी माझी छळवणूक केली, प्रत्येक गोष्टीत त्यांनी केलेली शाब्दिक सुनावणी आणि मारहाण त्यांनी माझ्याबरोबर केली ते आता लपवण्यासाठी ते खोटं स्टेटमेंट देत आहेत, असंही गिरीजा राऊत (Girija Raut) यांनी म्हटलं आहे.
Girija Raut : अघोरी कृत्य जसं की वेगवेगळ्या बाबांकडे इलाजासाठी म्हणून घेऊन जायचे
“२०१८ मध्ये म्हणजेच डिसेंबर २०१७ ला लग्न झाल्यापासून सप्टेंबर २०१८ पर्यंत आमच्यात काहीही शारीरिक संबंध आले नव्हते. त्यासाठी आमच्या फॅमिलीने बसून बोलणी केली आणि असं ठरलं होतं की, गणपतीवरून आल्यानंतर या गोष्टीवर काम करायला सुरुवात करू. पण गणपतीवरून आल्यानंतरच थोडक्यात अशी एक घाबरण्याची घटना झाली, ज्याला त्यांनी अघोरी इलाजांचं स्वरूप दिलं. हे कृत्य त्यांनी अक्षरशः सप्टेंबर २०१८ पासून २०२२ सालापर्यंत सुरू ठेवलं. या अघोरी कृत्यादरम्यान त्यांनी माझी मेडिकल ट्रीटमेंट केली. मला हायपोथायरॉईड असूनही त्यांनी मला जे अँटी-डिप्रेसेंट वगैरे दिले, त्याच्यामुळे मला सर्वोपरि त्यांनी प्रचंड त्रास दिलेला आहे. अघोरी कृत्य जसं की वेगवेगळ्या बाबांकडे इलाजासाठी म्हणून घेऊन जायचे. मग ते बाबा त्यांच्या त्यांच्या परीने इलाज करत होते; कोणी जिवंत कोंबडा अंगावरून उतरवत होतं, कोणी कणकेच्या बाहुल्या, तांब्याची तार, मांसाचे तुकडे, माझ्या अंगावरचे न धुतलेले वापरलेले कपडे आणि डोक्यावरचे केस ओढून अशा सगळ्या गोष्टी वापरून उतारे करत होतं. कच्चे गोमूत्र किंवा हळद खायला देणे, किंवा देवीसमोरील अगरबत्तीची उदी तीर्थ म्हणून पेला-पेला भरून प्यायला देणे असे सगळे विचित्र प्रकार केले. ते फक्त त्यांचा मुलगा शारीरिक संबंध करण्यासाठी असक्षम आहे हे लपवण्यासाठी त्यांनी हे सगळं पूर्ण प्लॅनिंग करून माझं आयुष्य बरबाद केलं आहे,” असंही गिरिजा राऊत यांनी म्हटलं आहे.
Girija Raut : ट्रॉमा त्यांनी मला या सात वर्षांत दिलेला आहे
“राजकीय दबाव जास्ती असण्यापेक्षा जो एक मेंटल ट्रॉमा मला दिला जात होता, घरच्यांकडून जे प्रेशराईज केलं जात होतं, जसं की नवरा मला मारहाण करून बोललेला आहे की, ‘माझ्या वडिलांनी दोन कोटी रुपये इलेक्शनसाठी लावलेले आहेत. तुझ्यामुळे त्यांच्या इमेजला जर धक्का गेला, तर तू बघ तुझं मी काय करीन’, असं सगळं म्हणजे इतकी विकृत वागणूक त्यांनी मला दिली. त्यांनी मला एका ट्रॅप मोडमध्ये ठेवलेलं होतं, ज्यामुळे नॉर्मल लाईफ हे माझ्यासाठी कधी नव्हतंच. त्यामुळे तुम्ही कल्पना करू शकता की काय ट्रॉमा त्यांनी मला या सात वर्षांत दिलेला आहे,” असंही त्यांनी म्हटलं आहे.
Girija Raut : विनायक राऊत हे त्यांच्या दुसऱ्या पत्नीबरोबर आणि मुलीबरोबर दुसऱ्या घरात राहतात
“विनायक राऊत हे त्यांच्या दुसऱ्या पत्नीबरोबर आणि मुलीबरोबर दुसऱ्या घरात राहतात. आम्ही या घरी राहतो, जे झोपडपट्टीत आहे. आम्हाला लग्नाच्या बोलणींपासून कधीही सांगण्यात आलं नव्हतं की दुसरं घर हे झोपडपट्टीत आहे. विनायक राऊत हे नवरात्रीच्या दिवशी घट बसतात त्या दिवशी आणि घट उठतात म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी, फक्त त्याच दोन दिवशी आमच्या घरी यायचे. इतर वेळी ते कधीही आमच्या घरी आले नाहीत. ते फोनवरून मला सांगायचे की, ‘तू अमुक गोष्ट कर, तू ही जबाबदारी घ्यायला पाहिजे, तू ती जबाबदारी घ्यायला पाहिजे’, पण त्यांनी त्यांच्या मुलाला किंवा त्यांच्या बायकोला कुठलीही गोष्ट समजावून सांगितली नाही. ते कधीही फोरफ्रंटवर आले नाहीत, ज्याच्यामुळे या दोघांचा अजून राग आणि फ्रस्ट्रेशन त्यांनी माझ्यावरच व्यक्त केलं. एक कुटुंबप्रमुख म्हणून जसं माझ्या सासऱ्यांनी हे सगळं त्या दोघांना सांगायला पाहिजे होतं, ते त्यांनी कधीही केलेलं नाही,” असंही त्यांनी म्हटलं आहे.
Girija Raut : मला भरीस पाडून वेगवेगळ्या तऱ्हेने छळलं आणि माझं आयुष्य अपमानित व घाणेरडं केलं
“विनायक राऊत एका ठिकाणी होते, पण हे अघोरी उपचारांसाठी आम्ही जिथे जिथे गेलेलो आहोत, ते सगळे कोकण पट्ट्यातले आहेत आणि मूळतः ते सिंधुदुर्ग पट्ट्यातले आहेत. त्यांनी जिथे जिथे सांगितलेलं आहे, तिथे तिथे आम्ही सगळीकडे हे इलाज केलेले आहेत,” असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे. “मला असं वाटतं की, त्यांनी आणि ज्यांनी मला जवळून पाहिलेलं आहे त्या सगळ्यांनी हा विचार करावा की, मी सात वर्ष तिथे होते. माझ्याकडे बऱ्याच संधी (मौके) होत्या, जिथे मी त्यांच्याकडून पैसे उकळू शकत होते किंवा त्यांच्या काही गोष्टींवर माझा हक्क दाखवू शकत होते, पण मी त्यात कधीही नव्हते. माझ्या सिम्पल अपेक्षा होत्या—माझ्या नवऱ्याबरोबर माझा सुखी संसार आणि माझ्या घरच्यांबरोबर आनंदाने नांदणं. ते त्यांनी न देता इतर गोष्टींमध्ये मला भरीस पाडून वेगवेगळ्या तऱ्हेने छळलं आणि माझं आयुष्य अपमानित व घाणेरडं केलं,” असंही त्यांनी पुढे सांगितलं आहे.
Vinayak Raut On Girija Raut : मी आणि माझ्या कुटुंबीयांवर लावलेले आरोप खोटे- विनायक राऊत
मी आणि माझ्या कुटुंबीयांवर लावलेले आरोप खोटे आहेत. गेल्या तीन वर्षांपासून गितेश आणि गिरीजा एकत्र राहत नाहीत. 2018 मध्ये घटना घडली असे सांगते आणि 2026 मध्ये त्याची तक्रार करत आहेत. यातंच काही काळं आहे. प्रत्येक वेळी तिचे आई-वडील तिच्यासोबत होते. सध्या त्यांची घटस्फोट केस सुरू आहे, अशी माहिती विनायक राऊतांनी दिली. या नोटिशीमध्ये दर महिन्याला खर्चासाठी 5 लाख द्यावे, अशी मागणीही गिरीजा राऊत यांनी केली होती. याशिवाय 10 कोटींची अधिक रक्कम द्यावी. मानसिक नुकसान भरपाई 2 कोटी द्यावी, अशी मागणी गिरीजा राऊत यांनी केली आहे. 5 रूमचं घर आणि ऑटोमॅटीक गाडी मागितली आहे. या मागण्या पूर्ण होत नाहीत, म्हटल्यावर तिने तक्रार केली, असा दावा विनायक राऊतांनी केला. आम्ही अघोरी उपचारांच्या आरोपांचे पूर्ण खंडन करतो. आम्ही त्या पंथातले नाही. आई-वडील समोर असताना तेव्हा तक्रार केली नाही. या संदर्भात आम्ही न्यायालयात गेलो आहोत, असं विनायक राऊत म्हणाले.
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Comments are closed.