निवडणुकीत इतकं तितकं होत असतं, हा काय बिहार थोडी आहे; संजय गायकवाडांची प्रतिक्रिया, म्हणाले….


संजय गायकवाड : बुलढाणा येथील शिवसेना आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांचा मुलगा कुणाल गायकवाड (Kunal Gaikwad) आणि नातेवाईक श्रीकांंत गायकवाड यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. स्थानिक नागरिकांनी पकडलेल्या बोगस मतदाराला (Bogus Voter) पोलिसांच्या तावडीतून पळवून लावण्यास मदत केल्या प्रकरणी कुणाल गायकवाड आणि श्रीकांत गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान याबाबत आता स्वतः आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी अभिप्राय देत पोलिसांनृत्य खडे गाण्याचे बोल सुनावले आहे. तर बुलढाण्यात पोलिसांनीच दहशत माजवली, असा दावाहे संजय गायकवाड यांनी केलाय.

Sanjay Gaikwad : निवडणुकीत इतकं तितकं होत असतं….! हा काय बिहार थोडी आहे?

बुलढाण्याबाबत काएल जे -जे दाखवल्या गेल्या त्यातून बुलढाण्याला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. अनेक मतदारांची नावे हे वेगवेगळ्या प्रभागात आहे. इकडे गेले की पुन्हा तीकडे आणि तिकडे गेले की पुन्हा इकडे पाठवतात. मी आणि माझी पत्नी एका बुथवर गेलो तर त्यांनी सांगितलं की तुमचं नाव दुसऱ्या बूथवर आहे. काल एका मुलाला इकडे नाव नव्हतं म्हणून दुसऱ्या प्रभागात पाठवलं आणि त्याला तिकडे मारलं. इतरांना त्याला मारायचा अधिकार नाही. त्याला मारत होते तेवढ्यात माझा मुलगा तिथे गेला आणि तो माझ्या मुलाला चिटकला. की, मला वाचवा वाचवा म्हणून इतर अजून कोणी मारेल म्हणून. त्या मुलाला इथून तू निघून जा, असं माझा मुलगा म्हटला, तर त्याचं काय चुकलं? निवडणुकीत इतकं तितकं होत असतं….! हा काय बिहार थोडी आहे? आमच शहर सुशिक्षित आहे. अशी अभिप्राय आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी दिलीय. ते बुलढाण्यात बोलत होते.

Sanjay Gaikwad : माझा मुलगा त्याला वाचवायला गेला, त्याचं काहीही चुकलेलं नाही

बुलढाण्यात कमी मतदानाचे कारण म्हणजे मतदारयादीत मृत लोकांचे नाव खूप आहेत. दुबार नावही आहेत. ते नाव निवडणूक आयोगाने आधी काढायला पाहिजे. याला निवडणूक आयोग जबाबदार आहे. इतर लोक त्या बोगस मतदार तरुणाला मारत होती, त्यामुळे माझा मुलगा त्याला वाचवायला गेला. त्याचं काहीही चुकलेलं नाही. त्या (विजयराज शिंदेला) जनतेने नाकारलं, व आता त्याची डिपॉझिट जायची वेळ आलीहे. भाजपच्या मतदाराने ही त्याला नाकारलं. माझ्या प्रभागात चाळीस वर्षापासून एकतर्फी जागा जिंकल्या जातात. पंधरा वर्षापासून हा त्याच्या आमदार असताना वार्डात जिंकला नाही.

Sanjay Gaikwad : निवडणूक आयोग महाराष्ट्राला वेठीस का धरतोहे?

दरम्याननिवडणूक आयोगाला निकाल लांबवण्याची गरज नव्हती. या निवडणुकीचा आणि त्या निवडणुकीचा काहीही फरक पडणार नाही. यामुळे नगर परिषदेचे प्रशासकीय कामे मागे पडतील. निवडणूक आयोग महाराष्ट्राला का वेठीस धरतो आहे हे कळत नाही. या निवडणुकीत कुठेही घोळ झालेला नाही आणि जो झालेला आहे तो निवडणूक आयोगाचा घोळ आहे. यांनी जिल्हा परिषदपर्यंत तरी हे याद्या क्लिअर करायला पाहिजेत. असेही संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) म्हणाले.

हेही वाचा

आणखी वाचा

Comments are closed.