असिम सरोदे म्हणाले, तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मुंबई महापालिकेतील राजकारण फिरवू शकतील!

शिवसेना राष्ट्रवादी पक्षाच्या नाव चिन्हावर सुनावणी शिवसेनेचे नाव व धनुष्यबाण हे चिन्ह भारतीय निवडणूक आयोगाने (Shivsena Ncp Party Name Symbol) एकनाथ शिंदे गटाला दिले आहे. त्याविरोधात उद्धव ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर उद्या (21 जानेवारी) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या सुनावणीकडे लागले आहे. (Shivsena Ncp Party Name Symbol Hearing)

शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पक्ष आणि चिन्हाचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. गेल्या तीन वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात याबाबत सुनावणी सुरु आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदे यांचा तर राष्ट्रवादी हा अजित पवारांचा पक्ष असल्याचा निर्णय दिला. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. गेल्या तीन वर्षांपासून सदर याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यावर उद्या सुनावणी होईल. सदर सुनावणीआधी ॲड. असिम सरोदे यांनी एक्सवर ट्विट करत महत्वाचं विधान केलं आहे. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या या सुनावणीत निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागल्यास शिंदेसेनेतील अनेकजण उद्धव ठाकरेंकडे स्वगृही परत जातील. तसेच उद्धव आणि राज ठाकरे मिळून मुंबई महापालिकेतील राजकारण फिरवू शकतील, असा दावाही असिम सरोदे यांनी केला आहे. (असीम सरोदे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुनावणी)

असिम सरोदे काय म्हणाले? (असीम सरोदे शिवसेना राष्ट्रवादी पक्षाची सुनावणी)

शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह..सुनावणीची तारीख उद्या सुप्रीम कोर्टात आहे. पण 37 नंबरचे मॅटर सुनावणीसाठी Reach होणे कठीण आहे. आता लोकांचा नवीन प्रश्न- जर एकनाथ शिंदेंकडून पक्ष चिन्ह व शिवसेना नाव काढून घेतले तर मुंबई महापालिकेत काय होईल? मला वाटते शिंदेसेना भाजपमध्ये विलीन होईल व एकनाथ शिंदे यांचे राजकीय महत्व एकदम कमी होईल. शिंदेसेनेतील अनेकजण उद्धव ठाकरेंकडे स्वगृही परत जातील व मूळ शिवसेना अधिक ताकदवान होईल. उद्धव आणि राज ठाकरे मिळून मुंबई महापालिकेतील राजकारण फिरवू शकतील. सर्वोच्च न्यायालयातील एका निर्णयामुळे सुरु झालेला खेळ सर्वोच्च न्यायालयाच कधीतरी संपवेल…असं असिम सरोदे यांनी म्हटलं आहे.

मागच्या सुनावणीत नेमकं काय घडलेलं? (Shivsena Ncp Party Name Symbol Hearing)

सदर प्रकरणी नोव्हेंबरमध्ये मागील सुनावणी झाली होती. त्या सुनावणीवेळीच सर्वोच्च न्यायालयाने अंतिम सुनावणीची तारीख निश्चित करत, प्रकरणाचा निकाल लवकरच दिला जाईल, असे संकेत दिले होते. त्यावेळी न्यायालयाने 21 व 22 जानेवारीला सलग दोन दिवस अंतिम युक्तिवाद ऐकून घेऊ, याव्यतिरिक्त दुसरे प्रकरण सूचिबद्ध केले जाणार नाही, असे स्पष्ट केले होते. त्यानुसार शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात उद्यापासून अंतिम सुनावणी सुरू होणार असून, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

https://www.youtube.com/watch?v=a5B0FhXuLoY

संबंधित बातमी:

Shivsena Ncp Party Name Symbol Hearing: शिवसेना नाव अन् चिन्हाबाबात उद्या सुनावणी; उद्धव ठाकरेंच्या बाजूने निकाल लागल्यास काय?, ॲड. असिम सरोदेंची धक्कादायक माहिती

आणखी वाचा

Comments are closed.