मुंबईत ठाकरे बंधूंविरोधात एकनाथ शिंदेंनी मोहरे निवडले; शिंदे गटाच्या सर्व उमेदवारांची यादी, एका

बीएमसी निवडणूक 2026 शिवसेना उमेदवारांची यादी मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना (Shivsena) यांचा जागावाटपाचा फॉर्म्युला सोमवारी रात्री निश्चित झाला. त्यानुसार मुंबईतील 137 जागांवर भाजप आणि 90 जागांवर शिवसेना लढेल. जागावाटपाचे सूत्र निश्चित झाल्यानंतर एकनाथ शिंदे (मराठी) यांच्या शिवसेनेकडून आपल्या उमेदवारांना सोमवारी रात्रभर एबी फॉर्म वाटण्यात आले. यामध्ये पहिला फॉर्म हा वडाळ्याचे माजी नगरसेवक अमेय घोले यांना एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. तर वांद्रे विभागातून विभाग प्रमुख कुणाल सरमळकर यांच्या पत्नी पल्लवी सरमळकर यांना शिंदे गटाने उमेदवारी दिली आहे. बंडखोरी टाळणयासाठी शिंदेंकडून पूर्णत: खबरदारी घेण्यात  आली आहे. जागावाटप ठरल्यानंतर रात्री उशिरा शिंदे गटाने कुठलीही यादी न काढता थेट इच्छूक उमेदवारांना अर्ज वाटण्यास सुरूवात केली. (Mumbai Mahanagarpalika Election 2026)

बीएमसी निवडणुकीतील शिवसेनेचे उमेदवार: एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मुंबईतील उमेदवार

  1. वनिता नरवणकर- वॉर्ड क्रमांक 197
  2. अमेय घोले
  3. पल्लवी सरमळकर
  4. सुप्रिया सुनील मोरे- वॉर्ड क्रमांक 200

आणखी वाचा

Comments are closed.