‘अबकी बार 70 पार, महापौर भाजपचाच होणार’; भाजपकडून स्वबळाचा नारा, ठाण्यात महायुतीमध्ये कलगीतुरा
शिवसेना विरुद्ध भाजपा ठाणे महानगरपालिका निवडणूक 2025: ठाणे महानगर पालिकेत (Thane Muncipal Corporation Election 2025) महायुतीत (Mahayuti) कमालीचे विसंवादी सूर निर्माण झाल्याचं दिसतंय. भाजप आणि शिवसेनेने ठाणे महापालिकेत स्वबळाचा नारा दिलाय. स्वबळावर ठाणे मनपा लढवण्याची मागणी शिवसेना नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी केलीय. काल आनंद आश्रम इथे नरेश म्हस्केंच्या उपस्थितीत शिवसेनेची बैठक झाली. या बैठकीत भाजपबाबत पदाधिकाऱ्यांकडून नाराजीचा सूर उमटला. तर आता ठाण्यात पार पडलेल्या भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या बैठकीतही ‘अबकी बार 70 पार’, ‘महापौर भाजपचाच होणार’, असा नारा देण्यात आला.
ठाणे भाजपाच्या 18 मंडळातून 416 इच्छुकांनी या कार्यशाळांमध्ये सहभाग घेतला. या बैठकीत ‘अबकी बार 70 पार’, ‘महापौर भाजपचाच होणार’अशी भूमिका भाजपच्या (Thane Election 2025) उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मांडली. निवडणूक पुर्व तयारी अभ्यास वर्गाच्या बैठकीत आमदार संजय केळकर,आमदार निरंजन डावखरे, शहर अध्यक्ष संदीप लेले,भाजप पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या इच्छुक उमेदवार कार्यशाळेत भाजपची स्वबळाची तयारी सुरु आहे. शिंदेंच्या शिवसेनेनंतर भाजपच्या देखील माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी स्वबळाचा नारा दिला आहे.
गणेश नाईक आणि एकनाथ शिंदेंमध्येही कोल्डवॉर- (मराठी vs Ganesh Naik)
शिवसेना करत असलेल्या विकासकामांत भाजप पदाधिकाऱ्यांचे अडथळे येत असल्याची तक्रार करण्यात आलीय. त्यावर खासदार म्हस्केंनी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न केले अशी माहिती समजतेय. दुसरीकडे ठाण्यात भाजपनेही स्वबळाची तयारी सुरू केलीय. 33 प्रभागातील इच्छुकांसाठी भाजपने शिबीर आयोजित केलं आहे. भाजप 33 प्रभागातील उमेदवारांची चाचपणी करणार आहे. त्याचसोबत काही दिवसांपूर्वी भाजपचा महापौर करण्याचं वक्तव्य आमदार संजय केळकरांनी केलं होतं. तसंच भाजपचे मंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्येही कोल्डवॉर सुरू आहे.
ठाणेकर अम्हालाच साथ देतील- संजय केळकर (Shivsena Shinde Group vs BJP Thane)
एकटे लढलो तर आमचा महापौर बसावा अशी इच्छा आहे आणि ठाणेकर अम्हालाच साथ देतील, अशी प्रतिक्रिया भाजपचे ठाण्यातील आमदार संजय केळकर यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. तसेच प्रशासकीय अधिकारी भ्रष्टाचार करतात, निर्धावतात कारण त्यांच्या मागे नक्कीच कोणीतरी असते, कोणाच्या पाठिंबा असल्याशिवाय ते भ्रष्टाचार करणार नाहीत, अशी संजय केळकर यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर टीका केली आहे.
महायुतीत स्वबळाचे नारे, VIDEO:
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.