बाळासाहेबांची शिवसेना कोणताही त्याग करायला तयार, मनसेशी युतीबाबत संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

राज ठाकरेया आणि उदव ठाकरे: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनी एकत्र येऊन महाराष्ट्राच्या राजकारणाची सूत्रं हाती घ्यावीत, ही राज्यातील जनतेची आणि लोकांची इच्छा आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी या इच्छेचा स्वीकार केला आहे. याबाबत उद्धव ठाकरे आज वर्धापन दिनाच्या मेळाव्यात बोलतील, असे संकेत खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिले. ते गुरुवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी संजय राऊत यांनी मनसेशी (MNS) युती करण्यासाठी ठाकरे गट कोणताही त्याग करायला तयार असल्याचे सूचित केले.

आज संध्याकाळच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे मनसेशी युती करण्याबाबत बोलतील ही अपेक्षा आहे. आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो की, मराठी माणसाच्या हितासाठी, कल्याणासाठी, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आणि मुंबईच्या रक्षणासाठी बाळासाहेबांची शिवसेना कोणताही त्याग करायला तयार आहे. उद्धव ठाकरे कधीही तुटेपर्यंत ताणत नाहीत, असे संजय राऊत यांनी सांगितले. शिवसेना आजपर्यंत कोणापुढे झुकली नाही. ही डरपोकांची संघटना नाही तर मर्दांचा महासागर आहे. काही लोक आमच्या पाठीवर वार करुन निघून गेले. पण आम्ही एकटे असलो तरी लढत राहू, असेही संजय राऊत यांनी म्हटले.

मराठी: एकनाथ शिंदेंनी बॅनरवर संस्थापक म्हणून अमित शाहांचा फोटो वापरावा: संजय राऊत

आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. काही हौशे-नवशे देखील त्यांच्या पक्षाचा वर्धापन दिन साजरा करत आहेत. त्यांनी वर्धापन दिनाचे बॅनर्स लावले आहेत. त्यावर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे. बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचा काय संबंध आहे. त्यांनी संस्थापक म्हणून अमित शाहांचा फोटो वापरला पाहिजे, असा टोला संजय राऊत यांनी शिंदे गटाला लगावला.

Shivsena Vardhapan din: मुंबईत शिवसेनेचे दोन वर्धापन दिन मेळावे

आज मुंबईत शिवसेनेचे दोन वर्धापन दिन मेळावे आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेकडून काल घेण्यात आली माजी नगरसेवकांची बैठक. सहा महिन्यानंतर उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांची बैठक घेतली. ३ डिसेंबरला घेतलेल्या बैठकीत ६४ माजी नगरसेवक ठाकरेंच्या शिवसेनेत होते. मात्र, मागील सहा महिन्यात ९ माजी नगरसेवकांनी ठाकरेंची शिवसेना सोडून शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. सध्या ठाकरे यांच्या शिवसेनेकडे 55 माजी नगरसेवक आहेत.

शिंदेंच्या शिवसेनेकडून ठाकरेंच्या शिवसेनेचे अधिकाधिक माजी नगरसेवक आपल्यासोबत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर दुसरीकडे डॅमेज कंट्रोलसाठी रणनीती  ठरवण्यासाठी  बैठका घेणे सुरू आहे. आजच्या वर्धापन दिन मेळाव्यामध्ये सुद्धा माजी नगरसेवकांसह पदाधिकारी कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरे काय मार्गदर्शन करणार याकडे लक्ष असेल.

https://www.youtube.com/watch?v=ofyzw5tt4lg

आणखी वाचा

फडणवीसांच्या भेटीनंतर आता एकनाथ शिंदेंचा डाव, राज ठाकरेंना आपल्या बाजूने वळवण्यासाठी ‘या’ शिलेदारावर सोपवली खास जबाबदारी

आणखी वाचा

Comments are closed.