शिंदेंच्या मंत्र्यांची खरी नाराजी रवींद्र चव्हाणांवर, कल्याण-डोंबिवलीतील प्रवेश ठरले निमित्त
मुंबई : भाजपच्या ऑपरेशन लोटसवरुन (भाजप ऑपरेशन लोटस) शिंदेंच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त करत थेट मंत्रिमंडळाच्या बैठकीवरच बहिष्कार टाकल्याचं दिसून आलं. त्यावरून आता तर्क-वितर्क लढवले जात आहेत. मात्र शिंदेंच्या मंत्र्यांची प्रमुख नाराजी ही भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (रवींद्र चव्हाण) यांच्याविरोधात असल्याचं समोर आलं आहे. भाजपच्या प्रदेशाध्यक्षांकडून जाणीवपूर्वक महायुतीत विघ्न निर्माण केले जात आहे, कल्याण डोंबिवलीत वैयक्तिक स्वार्थासाठी अजेंडा राबवला जात असल्याचा आरोप शिंदेंच्या मंत्र्यांनी (मराठी Ministers) केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राज्यात एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक सुरू आहे, तर दुसरीकडे महायुतीमध्ये नाराजीनाट्य सुरू आहे. भाजपच्या ऑपरेशन लोटसवर शिंदेंची शिवसेना नाराज आहे. त्याचमुळे शिंदेंच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला.
शिवसेना मंत्री विरुद्ध रवींद्र चव्हाण रवींद्र चव्हाणांवर शिंदेसेना नाराज
एकीकडे राज्यात अनेक ठिकाणी शिवसेनेतील नेत्यांना फोडून भाजपमध्ये घेतलं जात आहे. त्याचवेळी खासदार श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या कल्याण डोंबिवलीमध्येही भाजपने ऑपरेशन लोटस राबवल्याचं दिसून येतंय. शिंदेंच्या शिवेसेनेच्या तीन माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नातून हे प्रवेश झाले. त्यामुळे शिंदेसेना आता रवींद्र चव्हाण यांच्यावर नाराज आहे.
भाजपच्या प्रदेशाध्यक्षांकडून जाणीवपूर्वक महायुतीत विघ्न निर्माण केले जात आहे, कल्याण डोंबिवलीत वैयक्तिक स्वार्थासाठी अजेंडा राबवला जात आहे. राष्ट्रवादी आणि भाजपमधील काही नाराज शिवसेनेत यायला तयार होते. पण महायुतीमध्ये वाद नको म्हणून सेनेने त्यांना प्रवेश दिला नाही. त्याचवेळी भाजपने मात्र शिंदेंच्या नगरसेवकांनाच फोडल्याची तक्रार शिंदेंच्या मंत्र्यांनी केली आहे.
शिवसेना विरुद्ध भाजप: दोस्तीत कुस्ती नको
ज्यांच्या विरोधात महायुतीने काम केलं त्यांच्यासाठीही भाजपने रेड कार्पेट अंथरल्याचा आरोप केला जात आहे. दोस्तीत कुस्ती नको अशी शिवसेनेची भूमिका आहे. पण त्याला मित्र पक्षाकडून छेद दिला जातोय अशी तक्रार शिवसेनेकडून केली जात आहे.
शिवसेनेच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार मंत्र्यांना जर अधिकारच नसतील तर…
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकायचा हे प्री कॅबिनेटमध्येच ठरलं असल्याची माहिती समोर आली. आम्हाला जर अधिकार, निधी वाटप, अधिकारी बदली याबाबत अधिकार नसतील बैठकीला येऊन उपयोग काय? असा सवाल शिवसेनेच्या मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंना विचारल्याची माहिती सूत्रांनी दिली. भाजपची वाटचाल ही स्वबळावर जायची आहे आणि ते त्याच पद्धतीने वागत आहेत अशी तक्रारही शिंदेंच्या मंत्र्यांनी केली.
ही बातमी वाचा:
आणखी वाचा
Comments are closed.