चंद्रपुरात भाजपचा पराभव; मुनगंटीवारांची पक्षावर आगपाखड, आत मुख्यमंत्र्याच्या काकू थेट रामगिरीवर
Maharashtra Politics चंद्रपूर : भाजपच्या जेष्ठ नेत्या आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या काकू शोभाताई फडणवीस (Shobhatai Fadnavis) या मुखयमंत्र्यांच्या भेटीला रामगिरी येथे पोहचल्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात आलेले कालचे नगरपंचायतचे निकाल (Chandrapur Election Result) आणि त्यावर पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांची उघड नाराजी या सर्व पार्श्वभूमीवर शोभाताई फडणवीस यांची मुखयमंत्र्यांशी होत असलेल्या भेटीला विशिष्ट महत्व प्राप्त झाले . (शोभाताई फडणवीस cm फडणवीस रामगिरी बंगल्यावर)
भाजप अधिकारीची रामगिरी निवास्थानी महत्वाचे बैठक
तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनाही रामगिरी निवास्थानी बोलावून घेतले आहे. नागपूर महानगर पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने रामगिरी येथे अत्यंत म्हत्वाची बैठक होणार असल्याची माहिती आहे. तर कार्यकर्त्यांची नागपूरमध्ये स्वबळाची भावना असून शिवसेनेची 50 उमेदवारांची यादी तयार असताना युती म्हणून लढण्याचा प्रदेश नेतृत्वाचा आग्रह आहे. या सर्व विषयवार आज रामगिरी येथे खलबताम केली जाणार आहे, अशी देखील माहिती आहे.
Sudhir Mungantiwar : सुधीर मुनगंटीवारांची यांची उघड नाराजी, शोभाताई फडणवीसांची मुख्यमंत्रीशी चर्चा
राज्यभरात झालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये महायुतीचा गाजावाजा असताना चंद्रपूरमध्ये (Chandrapur Election Result) मात्र, भाजपला मोठं नुकसान झाल्याचं दिसून आलं. चंद्रपुरातील 11 पैकी आठ ठिकाणी काँग्रेसचे नगराध्यक्ष निवडून आलेत, तर भाजपला अवघ्या दोन जागा मिळाल्या आहेत. या पराभवानंतर पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी मात्र थेट पक्षाच्या नेतृत्वावर टीका केली. काँग्रेसने त्यांच्या नेत्यांना शक्ती दिली, तर आमच्या पक्षाने माझी शक्ती कमी केली, असं वक्तव्य मुनगंटीवारांनी केलं. त्यामुळे मुनगंटीवारांनी नाव न घेता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधल्याचं दिसून आलं. अशातच आता भाजपच्या जेष्ठ नेत्या शोभाताई फडणवीस (Shobhatai Fadnavis) या मुखयमंत्र्यांच्या भेटीला रामगिरी येथे पोहचल्याद्वारे त्यासंदर्भात काही बोलणं होतंय च्या? हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.