धोनी टीमसोबत, पण प्लेइंग XI मध्ये नाव असेल का?, हैदराबादविरुद्ध चेन्नई सामना, कोण जिंकणार?
सनरायझर्स हैदराबाद वि चेन्नई सुपर किंग्ज लाइव्ह अपडेट मराठीत: आज आयपीएल 2026 मध्ये डबल हेडरचा थरार रंगणार आहे. दिवसातील दुसऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) आमनेसामने येणार आहेत. हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे सायंकाळी साडेसात वाजता खेळवला जाणार आहे. टॉससाठी कर्णधार ईशान किशन आणि ऋतुराज गायकवाड सात वाजता मैदानात उतरतील. दोन्ही संघांची स्थिती साधारण सारखीच आहे. SRH ने पाच पैकी दोन सामने जिंकत गुणतालिकेत पाचवे स्थान मिळवले आहे, तर CSK नेही दोन विजय मिळवले असले तरी ते आठव्या क्रमांकावर आहेत. मात्र नेट रनरेटच्या बाबतीत SRH (+0.576) आघाडीवर असून CSK (-0.846) मागे आहे.
SRH वि CSK खेळपट्टी अहवाल
हैदराबादच्या या मैदानावर यंदाच्या हंगामात SRH तिसरा सामना खेळणार आहे. याआधीच्या दोन सामन्यांपैकी एकात त्यांनी विजय मिळवला आहे. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात SRH ने 216/6 असा मोठा डोंगर उभारून 57 धावांनी शानदार विजय मिळवला होता. पिच फलंदाजांसाठी अनुकूल मानला जातो. मोठे स्कोअर येथे वारंवार पाहायला मिळतात आणि आजही धावांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
SRH विरुद्ध CSK हेड-टू-हेड
सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यात आयपीएलमध्ये आतापर्यंत 22 सामने झाले आहेत. त्यात चेन्नईने 15 जिंकले तर हैदराबाद फक्त 7 वेळा विजय मिळावला आहे. इतिहास सीएसकेच्या बाजूने असला तरी एसआरएच सध्या नव्या आत्मविश्वासात दिसत आहे. अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, हेनरिक क्लासेन आणि इशान किशन यांसारख्या दमदार फलंदाजांवर संघाची मोठी भिस्त आहे. यासोबतच युवा वेगवान गोलंदाज प्रफुल्ल हिंगे आणि साकिब हुसेन यांच्या प्रभावी कामगिरीमुळे संघाचा बॉलिंग अटॅकही अधिक संतुलित झाला आहे. त्यामुळे हा सामना अत्यंत रोमांचक होण्याची चिन्हे आहेत.
सनरायझर्स हैदराबादचा संघ- (IPL 2026 SRH Full Squad)
पॅट कमिन्स (कर्ंधर), ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, अनिकेत वर्मा, आर. स्मृती, इशान किशन, हेनरिक क्लासेन, नितीश कुमार रेड्डी, हर्ष दुबे, कामिंदू मेंडिस, हर्षल पटेल, ब्रायडन कारसे, जयदेव उनाडकट, ईशान मलिंगा, झीशान कुमार हुसेन, शिवांग कुमार, अरविंद अरविंद, अरविंद अरविंद. तरमळे, अमित कुमार, प्रफुल्ल हिंगे, क्रेनस फुलेत्रा, लियाम लिव्हिंगस्टोन, शिवम मावी, जॅक एडवर्ड्स.
चेन्नई सुपर किंग्ज संघ – (IPL 2026 CSK पूर्ण संघ)
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), आयुष म्हात्रे, एमएस धोनी, संजू सॅमसन, डेवाल्ड ब्रेविस, उर्विल पटेल, शिवम दुबे, जेमी ओव्हरटन, रामकृष्ण घोष, नूर अहमद, खलील अहमद, अंशुल कंबोज, गुर्जपनीत सिंग, श्रेयस गोपाल, मुकेश चौधरी, राष्ट्रीय चौधरी, ए. कार्तिक शर्मा, मॅथ्यू शॉर्ट, अमन खान, सरफराज खान, मॅट हेन्री, राहुल चहर, जॅक फॉल्क्स, प्रशांत वीर.
Comments are closed.