अशोक खरातच्या निकटवर्तीयाचा कार अपघातात मृत्यू, कंटेनरचा चालक म्हणाला, ‘प्रचंड मोठा आवाज आला अन
जितेंद्र शेळके अपघात : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचे (Ashok Kharat) निकटवर्तीय आणि शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके (Jitendra Shelke) यांचा शुक्रवारी समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) झालेल्या भीषण अपघातात (Accident) मृत्यू झाला. संभाजीनगरहून शिर्डीकडे येताना धोत्रे गावाजवळ त्यांच्या कारने उभ्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने कार कंटेनरखाली घुसली. या अपघातात जितेंद्र शेळके (जितेंद्र शेळके) आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला असून मुलगा गंभीर जखमी झाला होता. या अपघाताविषयी (Accident news) घातपाताची शंका उपस्थित करण्यात आल्याने पोलिसांकडून संबंधित कंटेनर चालकाला शनिवारी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. पोलिसांकडून काल याप्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद केली असली तरी राजकीयदृष्ट्या हे प्रकरण अत्यंत महत्त्वाचे असल्याने आता कंटेनर चालकाची चौकशी करुन या दुर्घटनेमागे घातपात होता का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. (Maharashtra Crime news)
जितेंद्र शेळके यांची कार भरधाव वेगात असताना समृद्धी महामार्गावर कंटेनरला जाऊन धडकली होती. कार वेगात असल्याने कंटेनरच्या खाली जाऊन जितेंद्र शेळके आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला होता. हा कंटेनर उत्तर प्रदेशच्या (UP) अमेठी येथील जमाल वारिस हा चालवत होता. जमालने पोलिसांना दिलेल्या प्राथमिक जबाबामध्ये आपली बाजू मांडली. त्याने म्हटले की, मी हैदराबादवरुन अहमदाबादकडे जात असताना शुक्रवारी दुपारी 12 वाजता कंटेनरच्या रेडिएटरचा पाईप लीक झाल्याने गाडी गरम झाली होती. त्यामुळे मी कंटेनर रस्त्याचा बाजूने हळू वेगात घेऊन चाललो होतो. मी कंटेनर थांबवला नव्हता, फक्त वेग कमी होता. त्यावेळी मागून कार येऊन माझ्या कंटेनरला (Truck Car Accident) धडकली, असे जमाल वारिस याने पोलिसांना सांगितले. मला मागून जोरात आवाज आला. पण मला आरशात काही दिसले नाही. मी खाली उतरुन बघितले तेव्हा कार ठोकलेली दिसली, असेही त्यांनी सांगितले. आता पोलिसांकडून जमालची आणखी कसून चौकशी होण्याची शक्यता आहे. या चौकशीतून काही नवीन माहिती समोर येणार का, हे बघावे लागेल.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.