श्रीकांतचे उपांत्य फेरीचे स्वप्न भंगले
हिंदुस्थानचा बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतची चायना मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेतील झुंज अखेर उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आली. हाँगकाँगच्या ली चेक यियूने श्रीकांतला सलग दोन गेममध्ये 21-16, 21-16 असे पराभूत करत हिंदुस्थानी आव्हानाचा अडथळा दूर केला. अवघ्या 39 मिनिटांत श्रीकांतला शरणागती पत्करावी लागली. 33 वर्षीय श्रीकांतने सामन्याच्या सुरुवातीलाच आक्रमक खेळ करत 3-0 अशी आघाडी घेतली, मात्र ही आघाडी क्षणभंगुर ठरली. यियूने सलग तीन गुण मिळवत सामना 3-3 असा बरोबरीत आणला आणि त्यानंतर श्रीकांतची लयच बिघडवली. हाँगकाँगच्या खेळाडूने 14-6 अशी तब्बल आठ गुणांची आघाडी घेत पहिला गेम सहज खिशात घातला. ली चेक यियूने दुसऱया गेममध्ये सलग दुसरा गेमही 21-16 असा जिंकत सामना खिशात घातला.
Comments are closed.