लंका दहनासाठी हिंदुस्थान सज्ज
लॉर्ड्सवर 1932 साली हिंदुस्थानने पहिला कसोटी सामना खेळला होता. स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर हिंदुस्थानचा संघ आपला 600वा कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. हिंदुस्थानी संघाला दुखापतींचे ग्रहण लागलेले होते. त्यामुळे शनिवारपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी संघ निवडताना कर्णधार शुभमन गिलला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. हिंदुस्थानी संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी ही मालिका महत्त्वाची ठरू शकते. तिसऱ्या स्थानावर जायबंदी झालेल्या साई सुदर्शनच्या जागी देवदत्त पडिक्कलची एंट्री होणार आहे.
या खेळपट्टीवर भारतीय संघ तीन फिरकी गोलंदाजांसह उतरणार आहे. त्यामुळे रवींद्र जाडेजाबरोबर कुलदीप यादव आणि मानव सुथार यांचा समावेश होऊ शकतो. वेगवान गोलंदाजीमध्ये मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
Comments are closed.