शुबमन गिलने पराभवाचं खापर कोणावर फोडलं? पोस्ट मॅचनंतरचं वक्तव्य चर्चेत!
Shubman Gill on India defeat: कार्डिफ येथे खेळल्या गेलेल्या India vs England 2nd ODI दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाला इंग्लंडविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर तीन सामन्यांची मालिका आता 1-1 अशी बरोबरीत आली आहे. India vs England ODI series
सामन्यानंतर, भारतीय कर्णधार शुबमन गिलने Shubman Gill पराभवाचे कारण स्पष्ट करताना अप्रत्यक्षपणे फलंदाजांना जबाबदार धरले. गिलने सांगितले की, चांगली सुरुवात मिळूनही भारताने 300 ते 310 धावांचा टप्पा गाठायला हवा होता. तसेच, तळाच्या फळीतील फलंदाजांकडून वास्तववादी अपेक्षांपेक्षा जास्त अपेक्षा ठेवल्याची कबुलीही त्याने दिली.
सामन्यानंतर Shubman Gill statement बोलताना शुबमन गिल म्हणाला, “खरं सांगायचं तर, हा पराभव खूप निराशाजनक आहे. 25 षटकांनंतर आम्हाला वाटले होते की 300 ते 310 धावांची धावसंख्या चांगली ठरेल. आम्ही मजबूत स्थितीत होतो, पण मधल्या षटकांमध्ये आम्ही खूप जास्त विकेट्स गमावल्या.”
फलंदाजांच्या अपयशाबद्दल बोलताना गिल म्हणाला, “आमचे तळाच्या फळीतील फलंदाज हे काही सर्वोत्तम फलंदाज नाहीत. आम्ही खालच्या-मधल्या फळीतील फलंदाजांकडून थोडी जास्तच अपेक्षा केली होती. मिळालेल्या चांगल्या सुरुवातीचे मोठ्या धावसंख्येत रूपांतर करण्यात आम्ही अपयशी ठरलो. पुढच्या वेळी, अशा परिस्थितीत आम्ही लहान भागीदारी रचण्याचा प्रयत्न करू.”
इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूट याच्या नाबाद 99 धावांच्या खेळीबाबत बोलताना गिल म्हणाला, “240 धावांचे लक्ष्य फारसे मोठे नव्हते. जर आम्ही 300 धावा केल्या असत्या, तर आवश्यक धावगती required run rate 5.5 ते 6 च्या दरम्यान राहिली असती; ज्यामुळे त्याला घाईघाईत एखादा चुकीचा फटका मारण्यास भाग पाडण्याची संधी आम्हाला मिळाली असती. मात्र, प्रति षटक 4.5 ते 5 धावांच्या गतीने खेळणे ही जो रूटची खासियत आहे. म्हणूनच, आम्ही त्याला कोणतीही चूक करण्यास भाग पाडू शकलो नाही.”
Comments are closed.