IND vs NZ: शुभमन गिलची WTC इतिहासात कमाल; ही कामगिरी करणारा पहिला भारतीय फलंदाज
वेलिंग्टन कसोटीत भारताच्या फलंदाजांनी उत्कृष्ट फलंदाजी करत संघाच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. सुरूवातीच्या फलंदाजांनी केलेल्या मोठ्या धावसंख्येचा फायदा उचलत शुबमन गिलने झटपट धावा केल्या, पण ९८ धावांवर असताना मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो क्लीन बोल्ड होत माघारी परतला. पण या खेळीदरम्यानही त्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासात मोठा विक्रम आपल्या नावे केला, जो कोणत्याच भारतीय फलंदाजाला आतापर्यंत जमला नव्हता.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये (WTC) भारतीय फलंदाजांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या शुबमन गिलच्या नावावर आहे. त्यातच शनिवारी (२१ नोव्हेंबर) वेलिंग्टनमधील बेसिन रिझर्व्ह मैदानावर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रात त्याने आणखी एका मोठ्या टप्प्याला गवसणी घातली. गिलने WTC मध्ये ३ हजार धावा पूर्ण केल्या आहेत.
भारताच्या कसोटी आणि वनडे संघाचा पूर्णवेळ कर्णधार असलेला शुबमन गिल WTC मध्ये ३ हजार धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत हा टप्पा गाठण्यासाठी त्याला ८३ धावांची गरज होती. आपल्या खेळीतील ११७ व्या चेंडूवर ८३ धावांचा टप्पा गाठत त्याने हा ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला.
पहिल्या कसोटीत शुबमन गिलने आक्रमक फलंदाजी करत १४६ चेंडूत ९ चौकार व २ षटकारांसह ९८ धावांची खेळी केली. अवघ्या दोन धावांनी त्याचं विक्रमी शतक हुकलं. न्यूझीलंडच्या भूमीवरचं हे त्याचं पहिलं शतक ठरणार होतं. याशिवाय त्याने अर्धशतक करत २०१४ नंतर न्यूझीलंडमध्ये कसोटी शतक करणारा भारतीय फलंदाज होण्याचा मान मिळवला. २०१४ मध्ये धोनीने ही कामगिरी केली होती, त्याच्यानंतर १२ वर्षांनी ही कामगिरी केली.
शुबमन गिलनंतर आक्रमक फलंदाजी करत असलेल्या ऋषभ पंतने देखील ४१ धावा करताच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये ३ हजार धावा करण्याचा टप्पा गाठला. ऋषभ पंत दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस अर्धशतकी खेळी साकारत नाबाद परतला आहे. या सामन्यात त्याने ६२ चेंडूत ५ चौकार व २ षटकारांसह ५५ धावा केल्या आहेत.
Comments are closed.