चांदी एका महिन्यात 1,00,000 रुपयांनी महागली, सर्व रेकॉर्ड मोडले, दर किती रुपयांवर जाणार?

चांदीचे भाव मुंबई: चांदीच्या दरात तुफान तेजी सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. गेल्या एका महिन्यात चांदीच्या दरात 1 लाख रुपयांची वाढ झाली आहे. सोमवारी (19 जानेवारीला) मल्टी कमोडिटी एक्सचेंज आणि सराफा बाजारात चांदीच्या दरानं तीन लाखांचा टप्पा पहिल्यांदा ओळांडला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात देखील चांदीचे दर 93 ते 94 डॉलर प्रति औंस पाहायला मिळत आहेत. चांदीच्या दरातील वाढीचा प्रमाण भारतातील मागणीवर दिसून येऊ लागला आहे.

चांदीच्या मार्केटशी संबंधित तज्ज्ञांच्या अनुसार चांदीच्या दरातील वाढीमुळं सामान्य गुंतवणूकदार आणि खरेदी सध्या पहिल्यापेक्षा कमी झाली आहे. मनीकंट्रोल हिंदीच्या बातमीनुसार अनमोल सिल्वरचे सीईओ किशोर रुनवाल यांच्या मते सध्याच्या ट्रेंडनुसार चांदीचे दर 3 लाख 30 हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकतात. ते म्हणाले की चांदीच्या दरातील वाढीमुळं भारतात गुंतवणूकदार सध्या कमी सक्रीय आहेत.

Silver Rate : चांदीच्या दरात जोरदार तेजी

देशांतर्गत बाजारात फिजिकल चांदी डिस्काऊंटवर ट्रेड होत आहे. तर, अमेरिका आणि चीन सारख्या मोठ्या बाजारात चांदी प्रीमिअमवर विकली जात आहे. चीनमध्ये चांदी जवळपास 10 हजार रुपयांच्या प्रीमिअमवर विकली जात आहे यातून जागतिक स्तरावरील मागणी अधिक असल्याचं पाहायला मिळतंय.

चांदीच्या दरातील वाढीचा परिणाम चांदीपासून तयार झालेल्या वस्तूंच्या मागणीवर देखील पाहायला मिळतो. चांदीच्या दागिन्यांची मागणी कमी झालीय.मात्र, दरवाढ झाल्यानं उलाढाल पहिल्या सारखी कायम आहे. विक्री मात्र घटल्याचं पाहायला मिळतंय. चांदीच्या दागिन्यांची मागणी सोन्याच्या दागिन्यांच्या मागणीच्या तुलनेत चांगली आहे. गुंतवणूक म्हणून लोक सिल्वर ईटीएफमध्ये गुंतवणूक करत आहेत. प्रत्यक्ष चांदीची खरेदी कमी झालीय मात्र लोक आर्थिक गुंतवणूक म्हणून चांदीला प्राधान्य देत आहेत.

आयातीच्या बाबतीत एख ट्रेंड पाहायला मिळतोय. अधिक दर असले तरी भारतात चांदी मोठ्या प्रमाणावर आयात केली जात आहे. गेल्या वर्षीप्रमाणं यंदा देखील चांदी आयात कायम आहे. सोन्याची आयात घटली आहे. यावरुन गुंतवणूक आणि पुरवठ्याच्या हिशोबानं सोन्यापेक्षा चांदी अधिक आकर्षक असल्याचं पाहायला मिळतंय.

महाराष्ट्रात चांदीचा दर 3 लाखांच्या पार

चांदीचा आजचा भाव 3 लाख 4 हजार रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. चांदीचे भाव वाढल्याने 70 टक्के ग्राहक झालेत कमी, चांदीच्या विक्रीत मोठी मंदी आल्याची माहिती आहे. देशभरात प्रसिद्ध असलेल्या खामगाव येथील चांदीच्या बाजारपेठेत आज चांदीचा भाव उच्चांक स्तरावर पोहोचला आहे खामगाव येथील चांदीच्या बाजारपेठेत चांदीचे आजचे भाव 3 लाख 4 हजार रुपये प्रति किलो झाले आहेत. अमेरिकेने लादलेले निर्बंध,टॅरिफ, इराण आणि व्हेनेझुएलामध्ये असलेली अस्थिरता, व्याजदरात झालेली कमतरता यामुळे चांदी आणि सोन्याचे भाव वाढल्याचे व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. आगामी काळात असेच भाव वाढत राहतील, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. वाढत्या चांदीच्या भावामुळे चांदीचे 70 टक्के ग्राहक कमी झाल्यामुळे चांदीच्या बाजारपेठेत मोठी मंदी बघायला मिळत आहे.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.