शॉकिंग! भर रात्री धरणाच्या दिशेने गेले, विशीतल्या तरुण तरुणीने उचलले टोकाचे पाऊल, सिंधुदुर्ग हा
सिंधुदुर्ग गुन्हा: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे एका धक्कादायक घटना समोर आली आहे. कणकवली तालुक्यातील तरंदळे धरणात एका युवक आणि युवतीने एकत्र उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती बुधवारी रात्री सुमारे 1.30 वाजता समोर आली. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून लोक हळहळ व्यक्त करत आहेत. (Crime News)
मिळालेल्या माहितीनुसार, मृत युवकाचे वय 22 वर्षे तर युवतीचे वय 18 वर्षे आहे. दोघेही रात्रीच्या सुमारास धरणाच्या दिशेने गेल्याचे स्थानिकांना दिसले होते. मात्र पहाटेच्या वेळी धरणाजवळ काही संशयास्पद वस्तू दिसल्याने ग्रामस्थांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून शोधमोहीम सुरू केली असता पाण्यात दोघांचा मृतदेह आढळून आला.
प्रेमसंबंधाची शक्यता की कौटुंबिक कलह?
या दोघांनी एवढे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत अद्याप कोणताही ठोस निष्कर्ष निघालेला नाही. प्राथमिक तपासात प्रेमसंबंधांची शक्यता पोलिसांनी नाकारली नाही. मात्र, मृतांच्या कुटुंबीयांकडून चौकशी सुरू असून काही वैयक्तिक किंवा कौटुंबिक कारणांमुळे त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले असावे, अशीही चर्चा सुरू आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, दोघांचे मृतदेह बाहेर काढून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले असून पुढील तपास कणकवली पोलिसांकडून सुरू आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे कणकवली तालुक्यात हळहळ व्यक्त केली जातेय.
सटाण्यामध्ये 75 वर्षांच्या नरामधाचा 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार
नाशिक जिल्ह्यातील मालेगावमधील डोंगराळे येथे 3 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार (Nashik Crime News) करून तिची हत्या केलेच्या प्रकरणामुळे राज्यात संतापाची लाट उसळली होती. ही घटना घडून काहीच दिवस उलटले असतानाच आता सटाण्यामध्ये एका 9 वर्षांच्या चिमुरडीवर 75 वर्षांच्या नराधमाने अत्याचार (Nashik Crime News) केल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी या नराधमाला अटक केली आहे. नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागांमध्ये लहान मुलीवर लैंगिक अत्याचाराच्या (Nashik Crime News)घटना वारंवार घडत असल्याचं समोर येत आहे. सटाणा इथं एका 9 वर्षीय बालिकेवर 75 वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आल्यानंतर पुन्हा एकदा संतापाची (Nashik Crime News) लाट पसरली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे
आणखी वाचा
Comments are closed.