गायक गणेश शिंदे यांच्या कारला भीषण अपघात
‘मोगरा फुलला’ हा कार्यक्रम आटपून घरी परतत असताना गायक गणेश शिंदे यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. क्षणार्धात एअरबॅग्स उघडल्याने मोठा अनर्थ टळला आणि गाडीत असलेल्या तिघांचे प्राण वाचले. एअरबॅगमुळे गणेश शिंदे यांच्या छातीला दुखापत झाली असून गायिका सन्मिता शिंदे आणि गायिका प्रतीक्षा या दोघींच्या पायाला दुखापत झाली. या अपघाताबद्दलची माहिती खुद्द गणेश यांनी सोशल मीडियाद्वारे दिली आहे. प्रतीक्षाचे ऑपरेशन व्यवस्थित पार पडले असून सन्मिताचेही ऑपरेशन आता व्यवस्थित पार पडेल, असे गणेश शिंदे यांनी सांगितले.
Comments are closed.