केमिकल टँकला गळती, कॅलिफोर्नियात 40 हजार लोकांना घर सोडण्याचा आदेश

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये केमिकल टँकने प्रशासनाची झोप उडवली आहे. ऑरेंज कौन्टीच्या गार्डन ग्रोव्ह परिसरातील एका इंडस्ट्रीयल साईटवर ठेवलेला विषारी केमिकल टँक ओव्हरहिट झाला आहे. प्रशासनाने सुमारे 40 हजार लोकांना त्वरित परिसर सोडण्याचे आदेश दिले आहेत. परिस्थितीचे गांभीर्य विचारात घेऊन 9 स्क्वेअर किमी परिसराला रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच सुमारे 13 शाळा आणि दोन शैक्षणिक संस्थाही बंद करण्यात आल्या आहेत.

ही घटना कॅलिफोर्नियातील ऑरेंज काऊंटीमधील गार्डन ग्रोव्ह शहरात घडली आहे. येथे जीकेएन एरोस्पेस नावाच्या कंपनीत मिथाइल मेथॅक्रिलेट नावाचे रसायन असलेला दाबयुक्त टँक गरम झाला आणि त्यातून विषारी वायू बाहेर पडू लागला आहे.

Comments are closed.