तुम्ही सर्वजण एम्सला जाणार… मोटेगावकर विद्यार्थ्यांच्या अंगावर पाणी शिंपडायचा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

राजस्थानमधून सुरू झालेल्या या पेपरफुटीचे धागेदोरे महाराष्ट्रात पोहोचल्यानंतर सीबीआयने रेणुकाई करीअर सेंटरचा (आरसीसी) संचालक असलेल्या मोटेगावकरला पुण्यातून बेड्या ठोकल्या. या प्रकरणाने देशभर खळबळ उडालेली असताना अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा मोटेगावकरचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

इंटरनेटवर वेगाने पसरत असलेल्या या व्हिडीओमधील मोटेगावकर वर्गातील बेंचवर डेस्कवर उभा दिसतो. त्याच्या एका हातात पाण्याचा तांब्या आणि दुसऱ्या हातात आंब्याची पाने आहेत. तो या आंब्याच्या पानांच्या साहाय्याने तांब्यातील पाणी समोर बसलेल्या विद्यार्थ्यांच्या अंगावर मोठ्या आवेशाने शिंपडत आहे. पाणी शिंपडत असताना तो विद्यार्थ्यांना उद्देशून ओरडून सांगत आहे की, ‘‘तुम्ही सर्वजण थेट ‘एम्स’ला जाणार आहात आणि हा योग अनेक वर्षांनंतर आला आहे!’’ या व्हिडीओमध्ये विद्यार्थ्यांना विज्ञान शिकवणारा हा प्राध्यापक चक्क अंधश्रद्धेच्या आहारी गेल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. त्याच्या या कृत्याबद्दल राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे.

Comments are closed.