संतापजनक! अत्याचार झालेल्या तरुणीचं टोकाचं पाऊल, मृत्यूशी झुंज अखेर अपयशी; नात्यातील आरोपी…

Pandharpur Crime News : इंदापूर येथे इंजीनियरिंगचे शिक्षण घेत असणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली येथे एका मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध गावातीलच तरुणाने अत्याचार (Crime News) केल्याची कार्यक्रम घडली होती. याबाबत करकम पोलीस ठाणे या ठिकाणी 11 एप्रिल रोजी गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. मात्र यामध्ये आरोपीला अटक होत नव्हती. याचवेळी पीडिते तरुणानी नैराश्य आणि न्या मिळत नसल्याचा कारणातून टोकाचा निर्णय घेतला. यावेळी ऍसिड पिऊन आत्महत्येचा (Pandharpur Crime News) प्रयत्न देखील केला. वडिलांविना अनाथ असणाऱ्या या मुलीचा सांभाळ तिच्या आईने कष्ट करून केला होता. अत्याचारानंतर आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या या पीडितेवर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचार होत नसल्याने डॉक्टरांनी पीडितेस घरी पाठवले. याच काळात अत्याचार झालेल्या पीडित मुलीचा मृत्यू झाला.

Pandharpur Crime : संतप्त नातेवाईकांनी मृतदेह थेट पोलीस ठाण्यात आणलाआरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी

दरम्यानपीडित मुलीच्या नातेवाईकांनी तिचा मृतदेह थेट पोलीस ठाण्यात आणून आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली. सुमारे दोन तासाहून अधिक काळ रात्री पीडितेचा मृतदेह करकम पोलीस ठाण्यात ठेवण्यात आला होता. यामध्ये पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक करून तपासानुसार अधिकची कलमे गुन्ह्यात वाढवली जातील. असे आश्वासन दिल्यानंतर पीडित मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या मुलीवर अत्याचार करणारा नराधम हा तिच्या नात्यातीलच एक विवाहित आहे. मात्र अत्याचारानंतरही आरोपीला अटक करण्यात पोलिसांना अपयश आल्याने कुटुंबीय संतप्त आहेत. तर प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे पुन्हा एका तरुणीचा नाहक बळी गेल्याचे बोललं जात आहे.

Crime News : भंडाऱ्याच्या लाखनीत पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

आई – वडील घरी नसल्याचं बघून एका नराधमान पाच वर्षीय चिमुकलीला शेतात नेत मारहाण करीत पाशवी अत्याचार केला. हा संतापजनक प्रकार भंडारा जिल्ह्यातील लाखनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. सायंकाळी आई घरी परतल्यावर पीडित बालिकेनं घडलेला प्रकार आईला सांगितला. यानंतर आईच्या तक्रारीवरून लाखनी पोलिसांनी आरोपी विरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधात्मक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. आशिष टेंभुर्णे असं ३० वर्षीय आरोपीला लाखनी पोलिसांनी अटक केली आहे. घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक सुभाष बारसे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक संगीता गावडे करीत आहे.

आणखी वाचा

Comments are closed.