मतदानाचे फॉर्म घेऊन घरी का आला नाहीस म्हणत BLOला मारहाण; परळीत 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

SIR गुन्हे बातम्या: राज्यासह देशभरात सध्या एसआयआर प्रक्रिया राबवली जात आहे. याची जबाबदारी बीएलओ म्हणून शिक्षकांवर देखील देण्यात आली आहे. यामुळे शिक्षकांवर कामाचा (SIR Crime) प्रचंड ताण आला आहे. या एसआयआर नोंदणी कामाला कंटाळून अनके शिक्षणके taळाटाळ करत असल्याचे प्रकरण देखील आता समोर येऊ लागले आहे. अशातच वाढीव SIR मध्ये (SIR) असलेले तीन कर्मचारीवर कारवाईचा बडगा ugarat निलंबनची कारवाई करण्यात आली आहे. तर दुसरीकडे बीडच्या (Beed Crime News)परळीमध्ये मतदानाचे फॉर्म घेऊन घरी का आला नाहीस म्हणत बीएलओला (BLO) मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. तर शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी चार जणांच्या विरोधात परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वर्धा वार्ता : SIRच्या कामात कुचराई भोवली; तीन कर्मचारीचे निलंबन

वर्ध्यात एस आय आर मध्ये कामात हयगय करणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. यात दोन शिक्षक तर एका चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. वर्धा उपविभागात ही कारवाई करण्यात आल्याने शुक्षकांचा रोष वाढला आहे. एकीकडे अधिकाऱ्यांचा दबाव, तर दुसरीकडे राजकीय पक्षाचा देखील ससेमीरा वाढला असल्याची चर्चा आता कर्मचाऱ्यांच्या वर्तुळात आहे. शिक्षक संघटनानी आता याचा निषेध करायला सुरुवात केली आहे. शिक्षकांकडून निलम्बनाच्या कारवाईचा निषेध केला जात असून कोरोना काळात मिळालेले पुरस्कार परत करण्याचा इशारा प्रहार शिक्षक संघटनेने दिलाय.

Beed News: मतदानाचे फॉर्म घेऊन घरी का आला नाहीस म्हणत BLOला मारहाण; चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

बीडच्या परळीत बीएलओला लाथा बुक्क्यांनी मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडलीये.सध्या एस आय आर नोंदणीचा दुसरा टप्पा सुरू असून शहरातील पेठ मोहल्ला येथे असलेल्या शादी खाना कॅम्पमध्ये बीएलओ म्हणून काम करणारे शिक्षक महफूज जाकीर शेख यांना कॅम्प मध्ये येत मतदानाचे फॉर्म घेऊन आमच्या घरी का येत नाही असे म्हणत चौघांकडून चापटा बुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली.

इतकंच नाही तर या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हा मागे घेतला नाहीस तर आम्ही बाहेर येऊन तुला बघून घेऊ या भाषेत धमकी दिली. दरम्यान या प्रकरणी शाकीर अहमद शेख,जुनेद शेख, शोएब शेख आणि एक अनोळखी इसम अशा चौघा विरोधात शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास परळी शहर पोलीस करत आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या

Comments are closed.