Smriti Mandhana – स्मृती मानधनाचा विश्वविक्रम! महिला टी-20 क्रिकेटमधे अशी कामगिरी करणारी जगातील पहिली बॅटर
हिंदुस्थानची स्टार खेळाडू आणि महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना हिने इतिहास रचला आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानचा महिला संघ बांगलादेशची दोन हात करत आहे. या लढतीत स्मृतीने न्यूझीलंडच्या सुझी बेट्स हिचा विक्रम मोडत महिला टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी जगातील पहिली बॅटर होण्याचा बहुमान मिळवला आहे.
बांगलादेशविरुद्ध स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा या जोडीने हिंदुस्थानला विस्फोटक सुरुवात करून दिली. या दरम्यान स्मृतीने टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी जगातील पहिली महिला बॅटर होण्याचा विक्रमही केला. या जोडीने हिंदुस्थानला 72 धावांची सलामी दिली. स्मृती 19 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 37 धावा काढून बाद झाली.
महिला टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या बॅटर
स्मृती मानधना (हिंदुस्थान) – 4761*
सुझी बेट्स (न्यूझीलंड) – 4758
हरमनप्रीत कौर (हिंदुस्थान) – 4287
@mandhana_smriti आता ती महिलांच्या T20I इतिहासात सर्वाधिक धावा करणारी खेळाडू आहे
अपडेट्स ▶️ https://t.co/zMJKYRAVhE#TeamIndia | #AsianGames pic.twitter.com/kmj5gWqFiy
— BCCI महिला (@BCCIWomen) 20 सप्टेंबर 2026
100 षटकारही पूर्ण
दरम्यान, स्मृती मानधना हिने आणखी एक मैलाचा टप्पा पार केला. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये 100 षटकार पूर्ण करत तिने जगातील मोजक्या बॅटरमध्ये स्थान मिळवले. यात न्यूझीलंडची सोफी डिव्हाईन 134 षटकारांसह पहिल्या, वेस्ट इंडिजची डिएंड्रा डॉटिन 134 षटकारांसह दुसऱ्या, श्रीलंकेची चमारी अटापट्टू 120 षटकारांसह तिसऱ्या आणि स्मृती मानधना 100 षटकारांसह चौथ्या स्थानवर विराजमान आहे.
1️⃣0️⃣0️⃣
साठी अजून एक रेकॉर्डब्रेक पराक्रम #TeamIndia उपकर्णधार @mandhana_smriti
अपडेट्स ▶️ https://t.co/zMJKYRAVhE#AsianGames pic.twitter.com/ip94VhpzKm
— BCCI महिला (@BCCIWomen) 20 सप्टेंबर 2026
Comments are closed.