… तर तुमची खैर नाही, अजित पवारांचा बारामतीतून भावकीलाच दम; सुजय पवारांना थेट इशारा
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) हे आपल्या परखड आणि स्पष्ट स्वभावामुळे सर्वपरिचीत आहेत. तसेच, प्रशासनावर पकड ठेऊन वेळप्रसंगी आपल्याच पदाधिकाऱ्यांवर व कार्यकर्त्यांवरही ते फटकेबाजी करतात. दोन दिवसांपूर्वीच बीडमधील डीपीसीच्या बैठकीत अजित पवारांनी बीडमधील पदाधिकाऱ्यांना चांगलाच दम भरला होता. भ्रष्टाचार, खंडणी व गुन्हेगारीच्या घटनांवर अजित पवार चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. तसेच, अशा कृत्यांची गय केली जाणार नसल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. आता, बारामतीत (Baramati) अजित पवारांनी चक्क भावकीलाच दम भरला. तालुक्यातील नागरिकांच्या विहिरींच्या मंजुरीसाठी 75 हजार रुपये घेतले जात असल्याची तक्रार अजित पवारांकडे काहींनी केली होती. सुजय पवार यांच्याकडून पैसे मागितले जात असल्याचे अजित दादांना सांगण्यात आले. त्यावरुन, अजित पवारांनी जाहीर कार्यक्रमातून संजय पवार यांना इशारा दिला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बारामतीतील पंचायत समितीच्या जवळच्या इमारतीतील युनियन बँक ऑफ इंडियाचे शाखेचे उद्घाटन अजित पवारांच्या उपस्थितीत झाले. या कार्यक्रमाला राजेंद्र पवार देखील उपस्थित होते. येथील भाषणात बोलताना अजित पवार म्हणाले, आमची भावकी पैसे मागते आहे, अशी तक्रार आहे. सुजय पवार विहिरीमागे 75 हजार रुपये घेतात. पैसे घेत असतील तर त्याची काही खैर नाही, पण नसतील घेत तर शुभेच्छा असे म्हणत अजित पवारांनी भावकीलाच दम भरला. तसेच, बारामतीत सार्वजनिक टॉयलेट एवढं चांगले करणार आहे की, घरात पण असे टॉयलेट नसेल. 1 कोटी 20 लाख एकाची किंमत आहे. टॉयलेटला जायला पैसे लागणार आहेत, उगाच इकडे तिकडे बघायचं आणि सोडायचं असे चालणार नाही असे म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. दरम्यान, व्हेटरनरी डॉक्टरचे कॉलेज आपल्याला घ्यायचं आहे, राजू दादा इथे आहे पण 300 कोटी लागतात. खासगी संस्थेला पण देता येते एवढा खर्च झेपेल का? त्याची चाचपणी करतो आहे. मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली तर एक परळी आणि बारामतीत आणणार आहे, अशी घोषणाच त्यांनी केली.
पुरंदरला विमानतळ तिथेच होईल
दरम्यान,पुरंदरचे विमानतळ जिथे नागरी उड्डाण खात्याने ठरवले आहे तिथेच होईल, काही लोकांची नाराजी घ्यावी लागे तरीही ते तिथेच होईल, असे म्हणत पुणे जिल्ह्यातील दुसर्या विमानतळाबाबत अजित पवारांनी बारामतीकरांना माहिती दिली.
हेही वाचा
नामदेव शास्त्रींकडून धनंजय मुंडेंची पाठराखण; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, राजीनाम्यावरही भाष्य
अधिक पाहा..
Comments are closed.