पिस्तुलातील गोळी डावी भुवई अन् कानाच्यामधून बाहेर पडली, उपसरपंच गोविंद बर्गेंसोबत काय घडलं?

सोलापूर गुन्हेगारी गोविंद बार्ज: कलाकेंद्रातील नर्तकीच्या नादात डोक्यात गोळी झाडून आत्महत्या करणारे बीडच्या गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे सरपंच गोविंद बर्गे (Govind Barge) यांच्या मृत्यूविषयी एक नवीन माहिती समोर आली आहे. गोविंद बर्गे यांनी त्यांच्या गाडीत ड्रायव्हिंग सीटवर बसून स्वत:वर गोळी झाडून घेतली होती. बर्गे यांनी उजव्या कानशि‍लावर पिस्तुल ठेवून चाप ओढला होता. पिस्तुलातून सुटलेली गोळी थेट त्यांच्या डोक्यात शिरली होती आणि डाव्या डोळ्याच्या भुवईचा वरचा भाग आणि कानाच्यामधून बाहेर पडली होती. गोळी लागल्यानंतर गोविंद बर्गे ड्रायव्हिंग सीटवर एका बाजूला पडले आणि आठ ते दहा मिनिटांत त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती समोर आली आहे.

गोविंद बर्गे यांचे गेल्या दीड वर्षांपासून पारगाव कला केंद्रातील नर्तकी पूजा गायकवाड हिच्याशी प्रेमसंबंध होते. पूजा गायकवाड ही अवघ्या 21 वर्षांची होती. गोविंद बर्गे हे 8 सप्टेंबरला रात्री बार्शी तालुक्यातील सासुरे गावातील पूजाच्या घरी गेले होते. त्यानंतर 9 सप्टेंबरला पूजाच्या घरापासून काही अंतरावर उभ्या असलेल्या गाडीत बर्गे यांचा मृतदेह सापडला होता. पोलीस गोविंद बर्गे यांच्या गाडीपाशी पोहोचले तेव्हा गाडीची बॅटरी आणि डिझेल पूर्णपणे संपले होते. गोविंद बर्गे यांनी आत्महत्या करताना गाडी सुरु ठेवली होती. गाडीतील एसीही सुरु होता. मात्र, बराचवेळ गाडीचं इग्निशन सुरु राहिल्याने बॅटरी आणि डिझेल पूर्णपणे संपले होते. याशिवाय, पोलिसांना गोविंद बर्गे यांच्या गाडीत बिअरचे कॅन मिळाले.

पूजा गायकवाड हिने गोविंद बर्गे यांच्याकडून दागिने, पैसे आणि प्लॉट घेतला होता. मात्र, अलीकडेच तिची नजर गोविंद बर्गे यांच्या गेवराईतील अलिशान बंगल्यावर पडली होती. तिने हा बंगला आपल्या नावावर करुन देण्यासाठी गोविंद बर्गे यांच्याकडे हट्ट धरला होता. ही मागणी पूर्ण न केल्यास तुमच्याशी बोलणार नाही आणि तुमच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेन, अशी धमकी पूजाने गोविंद बर्गे यांना दिली होती. त्यामुळे गोविंद बर्गे हे तणावात होते.

Dancer Pooja Gaikwad: मी पूजाला सख्ख्या बायकोपेक्षा जास्त जीव लावला पण… गोविंद बर्गेंची खंत

गोविंद बर्गे याने पूजा गायकवाड हिला गेवराईतील नवीन बंगला बघण्यासाठी बोलावले होते. हा बंगला पूजाला खूप आवडला होता. तिने दोन दिवस तिकडेच मुक्काम केला होता. यानंतर पूजाने हा बंगला माझ्या नावावर करा, अशी मागणी केली होती. ही मागणी मान्य न झाल्यामुळे पूजाने बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी गोविंद बर्गे यांना दिली होती. गोविंद बर्गे यांनी आपल्या एका मित्राशी बोलताना म्हटले होते की, मी पूजाला सख्ख्या बायकोपेक्षा जास्त जीव लावला. पैसे दिले, जमीन दिली. पण ही आता मला सतत धमकी देत आहे. या सगळ्याचा मला मानसिक त्रास होत आहे, असे गोविंद बर्गे म्हणाले होते.

2024 मध्ये धाराशिवमधील तुळजाभवानी केंद्रात गोविंद बर्गे यांची पूजा गायकवाड हिच्याशी ओळख झाली. ती मूळची सोलापूरच्या बार्शी येथील होती. या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाल्यावर पूजाने गोविंद यांना म्हटले की, आजपासून मी तुमची मालकीण म्हणून सगळं काम करते. त्यामुळे आता तुम्ही माझा सगळा घरखर्च पाहायचा. त्यानुसार गोविंद बर्गे हे पूजाला आणि तिच्या नातेवाईकांना पैसे देत होते.

https://www.youtube.com/watch?v=U3NZT0FSRX8

आणखी वाचा

नर्तिका पूजावर पाण्यासारखा पैसा उधळला, मरताना उपसरपंचाच्या खिशात फक्त 900 रुपये उरले!

आणखी वाचा

Comments are closed.