भावकीत कळलं तर अब्रू जाईल.. गोविंद बर्गच्या मेहुण्याच्या तक्रारीत धक्कादायक खुलासे, प्रकरणाला व
बीड गुन्हा: गेवराई तालुक्यातील लुखासमला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे (वय 38) यांच्या आत्महत्येमुळे बीड जिल्ह्यासह सोलापूर परिसर हादरला आहे. 9 सप्टेंबर रोजी वैरागजवळील सासुरे गावात गोविंद यांनी स्वतःच्या कारमध्ये डोक्यात गोळी झाडून जीवन संपवलं. घटनेनंतर त्यांच्या मेव्हण्याने पोलिसांकडे धक्कादायक खुलासे करत तक्रार नोंदवली आहे. यात पारगाव कला केंद्रातील नर्तकी पूजा गायकवाड (वय 21) हिचं नाव स्पष्टपणे घेण्यात आलं आहे. आता या घटनेत गोविंद बर्गेंच्या मेव्हण्याने तक्रारीत धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यामुळे या घटनेला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे.
‘भावकीत अब्रू जाईल’ म्हणत केली होती विनवणी
फिर्यादीनुसार, पूजाच्या वारंवार संपत्ती व पैशांच्या मागण्यांमुळे गोविंद मानसिक तणावाखाली होते. त्यांनी तिला वारंवार समजावलं की, “तुला दुसरं घर घेऊन देतो, पण माझा बंगला किंवा मालमत्ता तुझ्या नावावर करू शकत नाही. असं झालं तर भावकीत माझी अब्रू जाईल.” तरीही पूजाने त्यांना सोडलं नाही, असा आरोप फिर्यादीत आहे. उलट पूजाने त्यांच्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन बोलणं पाडलं, असंही तक्रारीत नमूद आहे.
गोविंदा बर्गे हे गेल्या दीड वर्षापासून कला केंद्रातील नर्तकी पूजा गायकवाडच्या प्रेमात होते. यादरम्यानच्या काळात गोविंदने पूजाला आयफोन, प्लॉट, सोन्याचे नाणे आणि दागिने, बुलेट, शेतजमीन आणि तिचे सासुरे गावातील घर देखील बांधून दिले होते. मात्र, इतके करुनही पूजाने गोविंदसोबत बोलणे अचानक बंद केले आणि तो थेट नैराश्यात गेला.
बंगल्यापासून शेतीपर्यंत मागण्यांचा तगादा
तक्रारीनुसार, गोविंद बर्गे यांनी गेवराई येथे बांधलेल्या आलिशान बंगल्यावर नर्तकी पूजा गायकवाड हिने दावा केला होता. तिने दोन दिवस त्या बंगल्यात मुक्काम करून तो आपल्या नावावर करण्याचा तगादा लावला. मात्र गोविंद यांनी नकार देत म्हटलं की, “माझ्या पत्नी-वडिलांना कळल्यास भावकीत अब्रू जाईल.” तरीही पूजाने दबाव कायम ठेवला. त्यानंतर तिने “माझ्या भावाच्या नावावर पाच एकर शेती घेऊन द्या, नाहीतर मी बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करून बदनामी करीन,” अशी धमकी दिली. सततच्या या तगाद्यांमुळे मानसिक तणाव वाढून गोविंद यांनी आत्महत्या केली.
मानसिक त्रासामुळे घेतलं टोकाचं पाऊल
फिर्यादीत म्हटले आहे की, या सततच्या तगाद्यामुळे व धमक्यांमुळे गोविंद प्रचंड तणावाखाली गेले. अखेर 9 सप्टेंबरला त्यांनी वैरागजवळील सासुरे गावात, पूजाच्या घरासमोरच, कारमध्ये स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेने कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी पूजाला अटक केली असून तिला न्यायालयात हजर केल्यानंतर तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे. तिच्या कॉल रेकॉर्ड्स आणि आर्थिक व्यवहारांची तपासणी सुरू आहे. दरम्यान, चौकशीत पूजाने कबुली दिली आहे की, “माझे आणि गोविंद यांच्यात प्रेमसंबंध होते.” यामुळे या प्रकरणाचा तपास अजून गुंतागुंतीचा झाला आहे. सोलापूरमध्ये बीडच्या गेवराईमधील माजी उपसरंपचाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. आता या घटनेत गोविंद बर्गेंच्या मेव्हण्याने तक्रारीत धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यामुळे या घटनेला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.