हाताची नस कापली…; नंतर गळा चिरून डॉक्टरनं सपवलं जीवन, वळसंगकरांनंतर 12 दिवसांत दुसरी घटना, पं
सोलापूर: सोलापूर शहर आधी प्रख्यात मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येनं (Solapur Crime News) हादरलं होतं, त्यानंतर 12 दिवसांमध्येच शासकीय रुग्णालयात इंटर्नशिप करणाऱ्या डॉक्टराने अज्ञात कारणावरून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आधी नस कापली त्यानंतर स्वतःचा गळा (Solapur Crime News) चिरून डॉक्टर आदित्य नांबियार (वय 24, रा. मुंबई) याने सोलापुरात आपल्या रूममध्ये आत्महत्या केली. डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येच्या घटनेनंतर 12 दिवसांत ही दुसरी घटना घडल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. आत्महत्येमागील कारणांचा पोलिस शोध घेत आहेत.(Solapur Crime News)
आदित्यला 15 दिवसांपूर्वीच मिळालेली एमबीबीएसची पदवी
काल (मंगळवारी) सकाळी आठ वाजता ही घटना उघडकीस आली. याने सोलापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 15 दिवसांपूर्वी एमबीबीएसची पदवी मिळवली होती. आता तो स्वतंत्रपणे सोलापुरातील होटगी रोडवरील एका अपार्टमेंटमध्ये राहत होता. मंगळवारी वडिलांनी आदित्यला सकाळी फोन केला होता. पण त्याने फोन उचलला नाही. यामुळे त्यांनी आदित्यच्या मित्राला त्याला पाहण्यासाठी सांगितलं. मात्र, दरवाजा बंद असल्याने तो तोडून आत गेल्यावर आदित्य हा बाथरूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याचं दिसून आलं होतं. त्या ठिकाणी फक्त रक्तच दिसत होते.(Solapur Crime News)
घटनास्थळी काय-काय आढळलं ?
मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळी दोन इंजेक्शन, सलाइन, मोबाइल, पाकीट, आदी वस्तू आढळल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मानसिक तणावातून त्याने हे कृत्य केले असावे, अशी प्राथमिक शक्यता वर्तवली जात आहे. आदित्य अबोल होता. तो बोलत नसल्याने आम्हाला त्याच्या तणावाविषयी किंवा इतर कोणत्याही कारणांची माहिती नव्हती. हे वृत्त ऐकून आम्हालाही धक्का बसल्याचं त्याच्या मित्रांनी सांगितले.(Solapur Crime News)
शांत असलेल्या आदित्यने चाकूच्या साहाय्याने स्वतःचा गळा कापून घेत आत्महत्या केल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला. (Solapur Crime News)डॉ. आदित्य नमबियार असे आत्महत्या (Solapur Crime News) केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. आदित्य सोलापूरच्या होटगी रोड परिसरात भाड्याने राहत असलेल्या रूममध्ये गळा कापून घेत त्याने आपलं जीवन संपवलं आहे. रूममधील बाथरूममध्ये रक्तबंबाळ अवस्थेत डॉ. आदित्य याचा मृतदेह (Solapur Crime News) आढळून आला आहे. दरम्यान घटनास्थळावर पोलिस दाखल झाले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयाकडे रवाना करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.(Solapur Crime News)
अधिक पाहा..
Comments are closed.