माझं खरं आडनाव गुंड, हे त्याने विसरू नये; भाजपात जाणाऱ्या राजन पाटलांचा उमेश पाटलांना इशारा


उमेश पाटील यांच्यावर राजन पाटील : राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सोलापूर (Solapur) जिल्ह्यात सध्या भाजपचे कमळ फुलत असल्याचं चित्र दिसत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील 4 माजी आमदारांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासमवेत वर्षा बंगल्यावर बैठक झाली आहे. लवकरच त्यांचा भाजपा (BJP) प्रवेश होणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, यातील एक म्हणजे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil). मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर ते प्रथमच माध्यमांसमोर आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षात बेशिस्तपणा वाढला आहे, त्यामुळं आम्ही भाजपत जाण्याचा निर्णय घेतल्याचे राजन पाटील म्हणाले. यावेळी राजन पाटील यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील (Umesh Patil) यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. माझं खरं आडनाव गुंड आहे हे त्याने विसरू नये असंही ते म्हणाले.

राष्ट्रवादी अजित पवार पक्षात बेशिस्तपणा वाढला, त्यामुळं भाजपमध्ये प्रवेश करणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर मोहोळचे माजी आमदार राजन पाटील हे पहिल्यांदाच माजी आमदार राजन पाटील माध्यमासमोर आले आहेत. राजन पाटील यांनी भाजपत जाण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. अजित पवार गटात सुरु असलेल्या कारभाराविरोधात राजन पाटलांनी खंत व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्यावर खोचक शब्दात टीका केली. मी छोट्या माणसाबद्दल बोलत नाही, अशा शब्दात राजन पाटलांनी उमेश पाटलांवर टीका केली. राष्ट्रवादी अजित पवार पक्षात बेशिस्तपणा वाढला आहे, त्यामुळे आम्ही भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे राजन पाटील म्हणाले. माजी आमदार यशवंत माने हे निष्ठावंत आहेत, त्यामुळं ते आमच्या निर्णयाशी सहमत आहेत. ते देखील आमच्यासोबत येतील असे पाटील म्हणाले.

माझं खरं आडनाव गुंड आहे, हे त्याने विसरू नये, उमेश पाटलांना इशारा

राष्ट्रवादीचे जिल्हध्यक्ष उमेश पाटील यांनी माजी आमदार राजन पाटील याना खुले चॅलेंज दिले होते.  त्यावरून राजन पाटील यांनी उमेश पाटलांना देखील प्रतित्युत्तर दिलं आहे.  माझं खरं आडनाव गुंड आहे हे त्याने विसरू नये असंही पाटील म्हणाले. मी काय माझा लहान नातू मोहोळ, महाराष्ट्र काय देशात कुठंही एकटा येईल असेम्हणत राजन पाटील यांनी उमेश पाटील यांनी दिलेल्या चॅलेंजला प्रतित्युत्तर दिलं आहे.

नेमकं काय म्हणाले होते उमेश पाटील?

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटलांना खुलं आव्हान दिलं आहे. जिल्हा परिषदेला मी माझा नरखेड गट सोडून लढतो तुम्ही अनगर सोडून माझ्या विरोधात लढा असे उमेश पाटील म्हणाले. जर माझा पराभव झाला तर मी माझं राजकारण सोडून देतो असेआव्हान उमेश पाटील यांनी राजन पाटील यांना दिलं आहे. मी अनगर गावात गेल्यावर माझ्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला पण ‘अपने गली मे कुत्ता भी शेर होता है’ असे पाटील म्हणाले. मोहोळचे माजी आमदार राजन पाटील भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चानंतर जिल्हाध्यक्ष उमेश पाटलांनी ओपन चॅलेंज दिलं आहे. राजन पाटील हे अजित पवार गटाचे माजी आमदार तसेच राज्यमंत्री दर्जा असलेले सहकार परिषदेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. माझा बाप कुठला आमदार, खासदार, मंत्री नाही किंवा माझ्याकडे कारखाना, भरपूर पैसा नाही पण आमच्यात हिंमत आहे. पर्मनंट आमदार म्हणून तुम्ही म्हणवता मग हिम्मत असेल तर माझ्याविरोधात लढून दाखवा. जर माझा पराभव झाला तर मी माझं राजकारण सोडून देतो असे उमेश पाटील म्हणाले होते. मोहोळ तालुक्याला स्वातंत्र्य देण्यासाठी, दहशतमुक्त करण्यासाठी आम्ही लढत होतो. आम्हाला शहीद होण्याची भीती नाही. मी यांच्या गावात एकटा गेलो तेव्हा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. मात्र याबाबत मी वाच्यता केली नाही. कारण आपल्याला ठोकशाहीच्या मार्गाने नव्हे तर लोकशाहीच्या मार्गाने जाऊन यांचा पराभव करायचा आहे. एक म्हण आहे की, ‘अपने गली मे कुत्ता भी शेर होता है’. हे पण कारखान्यापर्यंत आले आणि हद्द संपली की माघारी गेले. पण लक्षात ठेवा तुम्हाला पण नरखेड, मोहोळमध्ये यायचे आहे. कोण कोणाला कमी नसते. तुम्ही फक्त बारावाड्यांचं पाणी पिला आहात, उमेश पाटील बाराशे गावांचे पाणी पिऊन आलाय हे लक्षात ठेवा. त्यामुळे 4 वर्षाच्या कालावधीत तुमचं 50 वर्षाचा साम्राज्य उध्वस्त करू शकलो हे लक्षात ठेवा अशी टीका उमेश पाटील यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

Umesh Patil: ‘अपनी गली मे कुत्ता भी शेर होता है’; सोलापुरात अजितदादांच्या पक्षात जुंपली, उमेश पाटलांचं राजन पाटलांना खुलं आव्हान, माझ्या विरोधात लढा जिंकलात तर..

आणखी वाचा

Comments are closed.