सोलापुरात एमआयएमला मोठा धक्का, प्रदेश कार्याध्यक्ष फारुख शाब्दि यांचा राजीनामा
सोलापूर : महानगरपालिका निवडणुकीच्या (Mahanagar palike election) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी हालचाली सुरु केल्या आहेत. या निवडणुकीच्या दृष्टीने अनेक पक्ष प्रवेश होताना दिसत आहेत. अशातच सोलापुरात (Solapur) एमआयएम पक्षाला मोठा धक्का बसला आहे. एमआयएमचे प्रदेश कार्याध्यक्ष फारुख शाब्दि ( Farooq Shabdi) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. इम्तियाज जलील यांच्या नंतर फारुख शाब्दि हे एमआयएमचे राज्यातील दुसरे मोठे नेते होते.
फारुक शाब्दिवर सोलापूर शहराध्यक्ष पदासह मुंबई शहराध्यक्ष, प्रदेश कार्याध्यक्ष अशा जबाबदाऱ्या
सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून (Solapur City Central assembly constituency) फारुख शाब्दि यांनी दोन वेळा निवडणूक लढवली होती. मात्र, या दोन्ही वेळेला त्यांना पराभवचा सामना करावा लागला होता. दोन्ही वेळेस फारुख शाब्दि हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते. त्यांच्याकडे सध्या सोलापूर शहराध्यक्ष, मुंबई शहराध्यक्ष, प्रदेश कार्याध्यक्ष अशा जबाबदारी होत्या. मात्र पक्षात सुरु असलेल्या अंतर्गत राजकारणमुळे शाब्दि यांनी पक्षाला सोडचिट्टी दिली आहे.
सोलापुरात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का, उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवाराचा MIM मध्ये प्रवेश
महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून जागावाटप आणि उमेदवारांच्या याद्या जाहीर होण्याचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. काँग्रेसने याद्या जाहीर करण्यात आघाडी घेतली असून सोलापूर आणि कोल्हापुरात उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली होती. कोल्हापुरात 48 तर सोलापुरात 20 उमेदवारांची पहिली यादी काँग्रेसने जाहीर केली होती. मात्र, सोलापुरात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला असून जाहीर केलेल्या पहिल्या यादीतील उमेदवाराने थेट एमआयएम पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे, काँग्रेसच्या इतर उमेदवारांच्या भुवया उंचावल्या असून इच्छुकांच्या मुलाखती घेताना अपमानास्पद वागणूक दिल्याचे फिरदोस पटेल यांनी म्हटलं आहे.
सोलापुरातील प्रभाग 16 च्या काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार माजी नगरसेविका फिरदोस पटेल यांनी आज एमआयएममध्ये प्रवेश केला. एमआयएमचे प्रदेश कार्याध्यक्ष फारुख शाब्दि आणि निरीक्षक अन्वर सादात यांच्या उपस्थितीत फिरदोस पटेल यांचा एमआयएममध्ये प्रवेश झाला. फिरदोस पटेल ह्या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात, 2017 मध्ये सोलापूर महापालिकेत काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. दरम्यान, सोलापुरात काँग्रेसने 20 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
सोलापुरात प्रणिती शिंदेंना दे धक्का, उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवाराचा MIM मध्ये प्रवेश; समोर आलं राज’कारण’
आणखी वाचा
Comments are closed.