पूरग्रस्त गावात चमकोगिरी करणाऱ्या शिंदे गटाच्या नेत्याला गप्प करणारे कुमार आशीर्वाद कोण?


ज्योती वाघमेरे आणि कुमार आशिरवाड: पूरग्रस्तांच्या मदतीवरून शिवसेनेचा प्रवक्त्या ज्योती वाघमारे आणि सोलापूरच्या जिल्हाधिकारी यांच्यात झालेल्या खडाजंगीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सत्ताधारी पक्षाच्या नेत्याला खडेबोल सुनावणारा आयएएस अधिकारी कोण अशी चर्चा देखील आता सोशल मीडियावर सुरु झालीय. शिवसेना प्रवक्ता डॉ. ज्योती वाघमारे यांना खडेबोल सुनावणारे अधिकाऱ्याचे नाव कुमार आशीर्वाद असे आहे. कुमार आशीर्वाद हे सध्या सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील पाकणी गावात ज्योती वाघमारे या पाहणीसाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांनी राजकीय फॅशनप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावून जाब विचारायला सुरुवात केली. इकडे गावातील सगळ्या लोकांसाठी जेवणाची व्यवस्था नाही. तुमचे सरकारी अधिकारी गावात नाहीत, अशा शाब्दिक फैरी ज्योती वाघमारे यांनी झाडल्या होत्या. त्यावर कुमार आशीर्वाद यांनी ज्योती वाघमारे यांना प्रत्युत्तर दिले होते. गावाची लोकसंख्या इतकी मोठी आहे, मात्र जेवणाची व्यवस्था का नाही, असा सवाल ज्योती वाघमारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना विचारला. यावर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद चांगलेच संतापले. त्यांनी ज्योती वाघमारे यांनी स्पष्ट शब्दांत सुनावले. त्यांनी म्हटले की, ‘तुमचं राजकारण नंतर करा. आम्ही मदत पोहोचवतोय पण तुम्ही देखील तुमच्या पक्षाच्या वतीने मदत करा’, असे प्रत्युत्तर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले. ही क्लीप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली होती.

Who is IAS Kumar Ashirwad: कोण आहेत कुमार आशीर्वाद?

कुमार आशीर्वाद यांचा जन्म 3 ऑक्टोबर 1988 साली झारखंड राज्यातल्या एका छोट्याशा गावात झाला. ज्या गावात कुमार आशीर्वाद यांचा जन्म झाला तिथं एखाद्याच्या घरात विद्युत पुरवठा असणं ही देखील चैनीची गोष्ट समजली जायची, इंटरनेट वगैरे तर फार दूरच्या गोष्टी होत्या. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत ही त्यांनी दार्जिलिंग आणि जमशेदपूर येथून कुमार आशीर्वाद यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर इंजिनियर होण्याच्या स्वप्नाने त्यांनी प्रतिष्ठीत अशा IIT खरगपूर येथे त्यांनी प्रवेश घेतला आणि बीटेकची पदवी संपादन केली. 2011 साली त्यांनी प्रशासकीय सेवेची तयारी सुरु केली. त्यासाठी ते मुखर्जी नगरला गेले. जवळपास 4 वेळा अपयश आल्यानंतर पाचव्यादा 2016 साली त्यांनी यशाला गवसणी घातली.

2016 साली त्यांनी देशात 35 वी रँक मिळवत IAS होण्याचे निश्चित केले आणि त्यांना महाराष्ट्र केडर मिळाले. युपीएससीच्या तयारीच्या दरम्यान त्यांनी अतिरिक्त वाचन, चुकीची वैकल्पिक विषय निवड, वर्तमानपत्रांचे जास्त वाचन अशा चुका केल्याचे ते सांगतात. त्यामुळे सामान्य ज्ञानासाठी गहन अभ्यासाऐवजी व्यापक समज विकसित करा आणि यूपीएससीसाठी 9-10 तास सातत्यपूर्ण अभ्यास पुरेसा आहे, असा सल्ला देतात. IAS झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग ही गडचिरोली येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. 2023 पासून ते सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. संवेदनशील आणि धडाडीचे निर्णय घेणारा अधिकारी म्हणून कुमार आशीर्वाद यांची ओळख आहे. या दोन वर्षांच्या काळात कुमार आशीर्वाद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौऱ्याचे नियोजन, पंढरपूरच्या विठूरायाच्या वारीचे नियोजन, सोलापूरची विमानसेवा सुरु करण्यात कुमार आशीर्वाद यांची भूमिका अत्यंत महत्वाची राहिली आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी उजनी जलपर्यटन, पंढरपूर कॉरीडोर या सारखे विषय ते सध्या संवेदनशीलपणे हाताळत आहेत. सोलापूर जिल्ह्यात झालेल्या पूरपरिस्थितीत देखील कुमार आशीर्वाद हे अहोरात्र झटताना दिसत आहेत.

https://www.youtube.com/watch?v=ufwatpqy74w

आणखी वाचा

पूर आलेल्या गावात शिंदे गटाच्या ज्योती वाघमारेंची चमकोगिरी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सुनावलं, स्पष्टच बोलले…

आणखी वाचा

Comments are closed.