सोनम वांगचुक व काँग्रेसचे मुद्दे सारखेच; पण नरेंद्र मोदींनी वांगचुक यांची भेट का घेतली नाही? हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचे मुद्दे व काँग्रेस पक्षाचे मुद्दे सारखेच असून काँग्रेस पक्षाने वांगचुक यांच्या आधीपासूनच नीट परीक्षेचा मुद्दा हाती घेत शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दोघांचा लढा एकाच मुद्द्यासाठी, त्यामुळे राहुल गांधी यांनी त्यांची भेट का घेतली नाही, यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वांगचुक यांची अद्याप भेट का घेतली नाही? शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा का घेतला नाही? हा आहे, असा घणाघाती हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, सोनम वांगचुक यांनी याआधी लडाखच्या प्रश्नावरही उपोषण केले होते. पण भाजपा सरकारने त्यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करुन जेलमध्ये टाकले होते. मागील २० दिवसापासून त्यांचे नीट पेपर फुटी प्रश्नी उपोषण सुरु आहे पण भाजपा सरकारने त्यांच्या उपोषणाची दखल घेतलेली नाही.

नरेंद्र मोदी यांनी या विषयावर ‘मन की बात’ सुद्धा केलेली नाही पण काँग्रेसला मात्र वांगचुक यांच्याशी जोडून पाहिले जात आहे ते चुकीचे आहे. मोदी सरकारने नीट पेपर फुटीचा मुद्दा गांभीर्याने घेतलेला नाही. २४ लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरु आहे, म्हणूनच राहुल गांधी यांनी ‘छात्रों की गुंज’ हे देशव्यापी अभियान सुरु केले आहे आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, ही मागणी लावून धरली आहे, असेही सपकाळ म्हणाले.

Comments are closed.