उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात

मुंबई : नीट पेपरफुटीवरुन सुरू झालेल्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनानेच आत देशपातळीवर विस्तार केल्याचं दिसून येत आहे. राजधानी दिल्लीतील (Delhi) जंतर मंतर आणि संसद भवन परिसरात झालेल्या पोलिसांच्या लाठीचार्जनंतर विरोधकही आक्रमक झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर प्रमुख राजकीय पक्षांनीही आंदोलनाची तीव्रता कायम ठेवत पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. त्यासाठी, ठाकरे बंधूही आता आंदोलनाच्या मैदानात उतरले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दिल्लीत तर मनसेप्रमुख राज ठाकरे मुंबईत उद्या आंदोलन करणार आहेत. विशेष म्हणजे, युवक काँग्रेसही मुंबईत आंदोलनासाठी एकत्र येत आहे.

दिल्ली पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीचार्जमुळे देशभरातून संताप व्यक्त होत आहे. तर, दिल्लीतील आंदोलनस्थळी गर्दी वाढत असून राजकीय नेतेमंडळीही उपोषणकर्त्यांची भेट घेत आहेत. आज काँग्रेस नेते राहुल गांधी हेही जंतर मंतरवर गेल्याचं दिसून आलं, तर राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार हेही मैदानात उतरले होते, त्यांनीही अभिजीत दीपकेशी संवाद साधत आंदोलनावर चर्चा केली. एकीकडे दिल्लीच्या आंदोलनाल बळ मिळत असताना, मुंबईतही आंदोलनाची तीव्रता वाढत आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षाकडून मुंबईतील शिवाजी पार्कवर सरकारविरुद्ध आंदोलन केल्यानंतर आता उद्धव ठाकरे थेट दिल्लीत पोहोचले आहेत.

राज ठाकरेंचं मुंबईत आंदोलन

उद्धव ठाकरे काही वेळातच दिल्लीत पोहोचणार आहेत, त्यामुळे ते आजच जंतरमंतरवर जाऊन आंदोलकांची भेट घेतली. तर, दुसरीकडे मनसेप्रमुख राज ठाकरे हेही उद्या आझाद मैदानात आंदोलनासाठी येतील, असे दिसून येते. कारण, मनसेनं चला व्यवस्थेला प्रश्न विचारुया म्हणत आंदोलनाची हाक दिली आहे. मुंबईतील आझाद मैदानात उद्या सकाळी 11 वाजता मनसैनिकांना येण्याचे आवाहन पक्षाच्यावतीने करण्यात आलंय. त्यामुळे, अमित ठाकरेंच्या नेतृत्वातील या आंदोलनात राज ठाकरेंचाही थेट सहभाग असण्याची शक्यता आहे. त्यातच, राज ठाकरेंनी आजच फेसबुक पोस्ट करत दिल्लीतील आंदोलनवरुन सरकारवर कडक शब्दात प्रहार केला होता.

विद्यार्थ्यांनी जो संघर्ष उभा केला आहे त्याचं मनापासून कौतुक. शेजारच्या श्रीलंकेत 2022 ला विद्यार्थ्यांनी असंच आंदोलन उभं केलं होतं. 2011 चं अरब स्प्रिंग, नेपाळ मध्ये देखील तेच. ही सगळी अगदी ताजी उदाहरण आहेत. जय प्रकाश नारायण यांनी संपूर्ण क्रांतीचं आंदोलन उभं केलं त्याचा पाया हा पण विद्यार्थ्यांच्या असंतोष होता. आज आपल्या देशातील विद्यार्थ्यांच्या या धैर्याला पण सलाम, असे म्हणत राज ठाकरेंनी आंदोलनातील विद्यार्थ्यांचं कौतुक केलं होतं. आता, उद्या मनसेचं मुंबईत आंदोलन होत आहे.

काँग्रेसंचही आंदोलन

काँग्रेसनेही आंदोलनाची हाक दिली असून अंधेरीत युवक काँग्रेसच्यावतीने दुपारी 1.30 वाजता आंदोलन करण्यात येईल. त्यामुळे, उद्याचा दिवस देखील आंदोलनाचाच असल्याचं पाहायला मिळत आहे.

Comments are closed.