सौरव गांगुलीने ममता बॅनर्जींचा मेसेज युसूफ पठाणपर्यंत पोहोचवला? माजी कर्णधारानं दिलं स्पष्टीकरण
मुंबई : देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा (विधानसभा) निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवला असून ममता बॅनर्जी यांच्या पक्षाची चांगलीच वाताहत झाल्याचं पाहायला मिळालं. ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला अवघ्या 80 जागांवर समाधान मानावं लागलं. मात्र, त्यानंतरही त्यांचा राजकीय संघर्ष सुरूच असून ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. एकीकडे तृणमूल काँग्रेसच्या राजकीय भविष्याची चर्चा सुरू असतानाचा दुसरीकडे टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने ममता बॅनर्जींचा मेसेज माजी क्रिकेटर युसुफ पठाणपर्यंत पोहोचवल्याचीही जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, आता स्वत: सौरव गांगुली या चर्चेवर स्पष्टीकरण दिलं असून आपण कधीही ममता बॅनर्जींचा (Mamta bannerjee) मेसेज युसूफपर्यंत पोहोचवला नसल्याचं त्याने म्हटलं आहे.
पश्चिम बंगालच्या राजकारणात सध्या बहरामपूर लोकसभा मतदारसंघाविषयी जोरदार चर्चा सुरू आहे. याच मतदारसंघाबाबत सध्या उलट-सुलट चर्चा सुरू असून ममता बॅनर्जींनी सौरव गांगुलीमार्फत येथील खासदार युसूफ पठाण यांना राजीनामा देण्याची मागणी करण्यात आली होती. भविष्यात ममता बॅनर्जींना संसदेत पाठविण्यासाठी तृणमूलकडून हा राजकीय डाव आखला जात असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, सौरव गांगुलीने हे वृत्त फेटाळले असून मी कुठलाही निरोप युसूफ पठाणला दिला नसल्याचं सौरवने स्पष्ट केलं. दरम्यान, युसूफ पठाण ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसचे खासदार असून ते बहरामपूर लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. मात्र, विधानसभेतील पराभवानंतर आता ममता बॅनर्जी त्याच जागेवरुन संसदेत जाऊ इच्छित असल्याची माहिती आहे.
कुठल्याही राजकीय घडामोडीत सहभाग नाही
युसूफ पठाणसोबत माझं कुठलंही बोलणं झालं नाही, मी कुठलाही राजकीय संदेश, निरोप युसूफला दिला नाही. तसेच, ममता बॅनर्जींनी मला कुठलाही राजकीय संदेश पोहोचवण्यास सांगितले नव्हते किंवा मी कुठल्याही राजकीय घडामोडीत सहभागी नाही, असेही सौरव गांगुलीने चर्चेबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. तर, माध्यमांनीही जबाबदारीने वृत्तांकन करायला हवं, अशा बातम्या देताना खात्री करुनच बातमी करायला हवी, असेही सौरव गांगुलीने म्हटले आहे. त्यामुळे, माझ्यावर लावण्यात येत असलेले सर्व आरोप खोटे आणि निराधार आहेत, असे गांगुलीने स्पष्ट केले.
हेही वाचा
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
Comments are closed.