ब्रह्मोस सज्ज युद्धनौकांचा वेग वाढणार आहे.

नॉर्वेच्या कंपनीकडून मिळणार घातक तंत्रज्ञान : कोची शिपयार्डसोबत महत्त्वपूर्ण करार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीय नौदलाच्या नव्या क्षेपणास्त्र युद्धनौकांसाठी कोची शिपयार्ड आणि नॉर्वेच्या कोंग्सबर्गदरम्यान मोठा करार झाला आहे. 18 वॉटरजेट सिस्टीमच्या पुरवठ्यामुळे भारतीय नौदलांच्या युद्धनौकांचा वेग, स्टील्थ आणि मारक क्षमतेत मोठी वाढ होणार आहे. हा करार कोंग्सबर्गसाठी आतापर्यंतचा सर्वात मोठा सिंगल वॉटरजेट ऑर्डर आहे.

नॉर्वेची प्रमुख कंपनी कोंग्सबर्ग मेरीटाइमला भारतीय नौदलाच्या ‘नेक्स्ट जनरेशन मिसाइल वेसल’ (एनजीएमव्ही) प्रोग्रामसाठी एक महत्त्वपूर्ण कंत्राट मिळाले आहे. या कराराच्या अंतर्गत कंपनी भारतीय नौदलाला 18 मोठ्या आणि अत्याधुनिक ‘कामेवा’ वॉटरजेट प्रोपल्शन सिस्टीमचा पुरवठा करणार आहे. या घातक तंत्रज्ञानाद्वारे ब्राह्मोसने युक्त नौदलाच्या युद्धनौकांचा वेग वाढणार आहे.

वॉटरजेट प्रोपल्शन सिस्टीम

पारंपरिक प्रोपेलर (पंख)च्या उलट वॉटरजेट तंत्रज्ञान पाण्याला आत ओढून, त्याचा वेग वाढविते आणि मग त्याला अत्यंत वेगाने बाहेर काढते. हे तंत्रज्ञान अनेकार्थाने पारंपरिक जहाजांपेक्षा प्रभावी आहे.

उत्तम स्टील्थ : रडारच्या पकडमध्ये येण्याची शक्यता कमी होते.

मोठा वेग अन् एक्सीलरेशन : युद्धतौकांना त्वरित तीव्र वेग मिळविण्यास मदत होते.

नियंत्रण क्षमता : युद्धनौकेला वळविणे आणि नियंत्रित करणे सोपे ठरते.

कमी ड्राफ्ट : उथळ पाण्यात देखील युद्धनौका सहजपणे संचार करू शकते.

अधिक सुरक्षित : यात बाहेरच्या बाजूने प्रोपेलर नसतो, ज्यामुळे नुकसान होण्याचा धोका कमी राहतो.

नौदलाच्या आधुनिक युद्धनौका आणि विशेषकरून मिसाइल वेसल्ससाठी ही क्षमता अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, त्यांना आव्हानात्मक सागरी वातावरणात चपळाई आणि अचूकतेची आवश्यकता असते. हा करार कोची शिपयार्ड लिमिटेडच्या सहकार्याने करण्यात आला तेथे सध्या या युद्धनौकांची निर्मिती केली जात आहे.

काय आहे एनजीएमव्ही कार्यक्रम?

भारतीय नौदलाचा एनजीएमव्ही (नेक्स्ट जनरेशन मिसाइल व्हेसल) कार्यक्रम 9,805 कोटी रुपयांचा एक मोठा पुढाकार आहे. याचा उद्देश अँटी-सरफेस वॉरफेयर (सागरी पृष्ठभागावरील युद्ध)साठी 6 अत्याधुनिक, हायस्पीड स्टील्थ कार्वेट (युद्धनौका) प्राप्त करणे समुद्रात शत्रूचा दबदबा समाप्त करण्यासाठी या युद्धनौका प्राथमिक स्ट्राइक प्लॅटफॉर्मच्या रुपात काम करतील.

या युद्धनौका अनेक शस्त्रास्त्रांनी युक्त असतील….

8 ब्राह्मोस क्षेपणास्त्रs

24 VL-SRSAM क्षेपणास्त्रे

प्रगत रडार आणि देखरेख प्रणाली

कोंग्सर्ब मेरीटाइम यापूर्वी अनेक वाणिज्यिक प्रकल्पांमध्ये सीएसएलचा एक मूल्यवान आणि विश्वसनीय भागीदार राहिला आहे. ही भागीदारी मजबूत तांत्रिक सहकार्य आणि परस्पर विश्वासाचे प्रतीक आहे. आम्ही या महत्त्वपूर्ण प्रकल्पाच्या कठोर मापदंडांनुरुप कोंग्सबर्गकडून एक उच्च गुणवत्तायुक्त आणि विश्वसनीय प्रणालीची अपेक्षा करत आहोत.

प्रवक्ते, कोचीन शिपयार्ड

हा एक मैलाचा दगड ठरणारा प्रकल्प आहे आणि आमच्या वॉटरजेट तंत्रज्ञानावर दर्शविण्यात आलेल्या विश्वासाचा पुरावा आहे. आमचे कामेवा वॉटरजेट या प्रगत क्षेपणास्त्रयुक्त युद्धनौकांसाठी आवश्यक वेग, चपळाई आणि विश्वसनीयता प्रदान करणार आहे.

एंडर्स वाल्केनेन, उपाध्यक्ष, कोंग्सबर्ग मेरीटाइम

Comments are closed.