सिंग इज किंग! धावपटू गुरिंदरवीर सिंगने 100 मीटर शर्यतीत रचला नवा राष्ट्रीय विक्रम

आजचा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाईल. कारण पंजाबचा 25 वर्षीय धावपटू गुरिंदरवीर सिंगने 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला आहे. यापूर्वी बराच काळ 100 मीटर शर्यतीमध्ये 10ः10 सेकंद हा राष्ट्रीय विक्रम होता. पण गुरिंदरवीर सिंगने यावेळी भारतीय ऍथलेटिक्स महासंघाच्या 100 मीटर धावण्याची शर्यत 10ः09 सेकंदांत यशस्वीपणे पूर्ण केली आणि नव्या विक्रमाला गवसणी घातली. ही 100 मीटरची शर्यत एवढय़ा कमी वेळेत पूर्ण करणारा तो पहिलाच भारतीय धावपटू ठरला आहे.

हे तर फक्त सुरुवातच आहे

धावणं हे काही भारतीयांच्या रक्तात नाही, अशी टीका गेल्या बऱ्याच वर्षांपासून सुरु होती. या टीकेला गुरिंदरवीरने चोख उत्तर दिले आहे आणि विजयानंतर त्याने ही गोष्ट बोलूनही दाखवली. राष्ट्रीय विक्रम रचल्यावर गुरिंदरवीर म्हणाला की, ‘लोकं म्हणायची की, 100 मीटर शर्यतीत धावणे हे भारतीयांच्या रक्तात नाही. मला त्या लोकांना चुकीचे सिद्ध करायचे होते. भारतीयांच्या रक्तात बऱ्याच गोष्टी आहेत, हे त्यांना आता समजले असेल. ही फक्त सुरुवात आहे. मला मिळत असलेल्या प्रशिक्षणाशी हे निकाल सुसंगत आहेत. मला आशा आहे की, आमचे प्रशिक्षण असेच चांगले राहील आणि आम्हाला चांगले परिणाम दिसतील. प्रशिक्षणात ज्या गोष्टींची कमतरता होती, त्या आम्ही सुधारल्या आहेत. आम्ही आमच्या कमकुवत बाजू ओळखल्या आहेत आणि आमची ताकद वाढवली आहे. शेवटच्या मिनिटांमध्य हा शारीरिक खेळापेक्षा अधिक मानसिक खेळ असतो. जो कोणी स्वतःला मानसिकदृष्टय़ा खंबीर ठेवेल, तोच जिंकेल.’

शेवटचा फेरीत कसा पाहायला मिळाला गुरिंदरविरचा आग

गुरिंदरवीरने उपांत्य शर्यतीत 10ः17 अशी वेळ नोंदवली होती. त्यामुळे अंतिम शर्यतीत तो यापेक्षा 1-2 सेकंद पुढे जाईल, असे म्हटले जात होते. पण अंतिम फेरीत गुरिंदरवीरचा जलवा सर्वांना पाहायला मिळाला. कारण अंतिम फेरीत गुरिंदरवीरने 100 मीटर धावण्यासाठी 10ः09 सेकंद एवढी सर्वात कमी वेळ घेत सर्वांनाच धक्का दिला.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी ठरला वर्ण

गुरिंदरवीर यावेळी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी सहजपणे पात्र ठरला आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी 100 मीटर धावण्याची शर्यत ही 10ः16 सेकंदांत पूर्ण करावी लागते. गुरिंदरवीर हा निषक सहजपणे पार केला आणि तो आता या स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.

फक्त पाच मिनिटांत दोनवेळा राष्ट्रीय विक्रम मोडला..

यावेळी 100 मीटर धावण्याची शर्यत ही नजरेचे पारणे फेडणारी झाली. कारण पंजाबचा गुरिंदरवीर आणि ओडिशाचा अनिमेश यांच्यात रोमांचक शर्यत पाहायला मिळाली. अनिमेशने गेल्या वर्षी 10.18 सेकंदांचा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला होता. त्यामुळे या शर्यतीचा तो प्रबळ दावेदार समजला जात होता. पण शुक्रवारी झालेल्या पहिल्या फेरीत गुरिंदरवीरने पहिल्या उपांत्य शर्यतीत 10.17 अशी वेळ नोंदवली आणि त्याने नवा विक्रम रचला. पण त्याचा हा विक्रम पाच मिनिटही कायम राहू शकला नाही. कारण पाचव्या मिनिटालाच 22 वर्षीय अनिमेशने दुसऱ्या उपांत्य शर्यतीत 10.15 सेकंदांची वेळ नोंदवून राष्ट्रीय विक्रम पुन्हा आपल्या नावावर केला. त्यामुळे राष्ट्रीय शर्यतीत फक्त पाच मिनिटांच्या अंतरांमध्ये दोन विक्रम मोडले गेल्याचे पाहायला मिळाले.

प्रचंड ठरला आशियामधील वेगवान धावपटू..

गुरिंदरवीरप्रमाणेच विशालनेही पुरुषांची 400 मीटर शर्यत 44ः98 सेकंदांत पूर्ण करून स्वतःचा राष्ट्रीय विक्रम मोडला. 45 सेकंदांपेक्षा कमी वेळेत ही शर्यत पूर्ण करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. विशालची ही वेळ या हंगामातील आशियातील सर्वात वेगवान वेळ आहे. त्यामुळे आशियातील तो सर्वात वेगवान धावपटू ठरला आहे.

फक्त 001 सेकंदांनी हुकला आशियाई विक्रम

गुरिंदरवीरने राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला. पण आशियाई विक्रम मात्र त्याचा फक्त 0ः001 सेकंदांनी हुकला. पण आशियामधील दुसरा सर्वात वेगवान धावपटू मात्र तो ठरला आहे. आशियाई विक्रम हा जपानच्या फुकुतो कोमुरोच्या नावावर आहे. जपानच्या फुकुतोने 100 मीटर धावण्याची शर्यत ही 10ः08 सेकंदांत पूर्ण केली होती. त्यामुळे फक्त एका सेकंदामुळे गुरिंदरवीरला या विक्रमाशी बरोबरी करता आली नाही.

Comments are closed.